परसोडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव
खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती, वणी अंतर्गत
सुरेंद्र इखारे वणी :- खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती वणी अंतर्गत “ केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2024 पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडा येथे आयोजित करण्यात आले आहे.
केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटक वणी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजयजी देरकर, तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अमोल चटप ,विशेष अतिथी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर, सरपंच ग्राम पंचायत परसोडा सौ मंगला आत्राम, शिक्षणविस्तार अधिकारी निलेश हेडाऊ, शिक्षणविस्तार अधिकारी प्रकाश नगराळे प्रमुख अतिथी सौ निलिमाताई जांभुळकर, सौ वीणाताई उपरे, अरविंद बोबडे, गजानन ताकसांड़े, दिनकर सरोदे, नितेश मडावी, सारिकाताई उरकुडे, विनोद उपरे, सौ अर्चनाताई धनकसार, सौ शितलताई येटे, सौ सुनीताताई भोस्कर, विनायक बोर्डे, सौ निशाताई कोडापे, प्रवीण शेळकी, संदीप पेंदोर, सौ वंदनाताई मत्ते, बालाजी म्हसे , गोपाल मसराम , शोड्रिल पंच विवेकानंद विद्यालय कायर येथील सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार, सहायक शिक्षिका सोनाली भोयर उपस्थित राहणार आहे.
खेळ व कला संवर्धनाच्या निमित्ताने 26 डिसेंबरला सकाळी 11 वाजता उद्घाटन सोहळा व शो ड्रिल, दुपारी 1ते2 भोजन विश्रांती, दुपारी 2ते5 सांघिक खेळ व वैयक्तिक
दिनांक 27 डिसेंबर सकाळी 10 ते2 सांघिक खेळ व वैयक्तिक, दुपारी 2ते3 भोजन विश्रांती,दुपारी 3ते5 सांघिक खेळ ववैयक्तिक,
दिनांक 28 डिसेंबर सकाळी 10ते2 वैयक्तिक स्पर्धा अंतिम सांघिक सामने,दुपारी 2ते3 भोजन त्यानंतर दुपारी 3ते5 बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल चटप व सौ वीणाताई उपरे व समस्त परसोडा ग्रामपंचायत समितीचे सदस्य, शाळा व्यवस्थापन, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,सामाजिक कार्यकर्ता व ग्रंपंचायत सचिव यांची उपस्थिती राहणार आहे.
तेव्हा कायर केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांनी आपल्या शाळेतील खेळ व कला मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रास्तरीय क्रीडा महोत्सवात सहभागी करावे असे आवाहन केंद्रप्रमुख कु अलका काळे, मुख्याध्यापक विलास गुडधे सर, सहायक शिक्षक भास्कर कुमरे, अजय महाजन, अविनाश मेश्राम, व समस्त ग्रामवासी परसोडा यांनी केले आहे