वणीच्या महसुल भवनात जनगणना पर्यवेक्षकांची आढावा बैठक संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- येथील महसूल भवन येथे आज दिनांक 4 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता भारताच्या 2027 च्या जनगणने संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली
याप्रसंगी भारताच्या 2027 च्या जनगणना चार्ज अधिकारी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले उपस्थित होते . वणी तालुक्यात सुरू असलेल्या जनगणने बाबत माननीय उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी पर्यवेक्षकांच्या आढावा सभेत त्यांनी भारताच्या 2027 च्या जनगणनेत घरयादी व घरगणना या संदर्भात प्रगणक यानी केलेल्या चुकांच्या संदर्भात मार्गदर्शन करून पर्यवेक्षकांनी प्रगणकांशी संवाद साधून वाढलेल्या इमारतीची पाहणी करून तसेच शौचालय उपलब्धता , पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत याबाबतच्या डेटा दुरुस्ती करण्याची संधी आहे ते करून घ्यावी गुगल मॅप नकाशा किंवा प्रगणकानी काढलेला नकाशा यामधील इमारती संख्या शक्यतो सारख्या असल्या पाहिजे यासाठी प्रत्येक पर्यवेक्षकांनी प्रगणकाना घेऊन इमारतीची पाहणी करावी व असलेल्या त्रुटींची दुरुस्ती करण्यात यावी असे उपस्थित पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर महसूल सहायक अधिकारी योगेश कोणापुरे यांनी ज्या प्रगणकानी mark as complete केले नसेल तर 5 तारखेपर्यंत करून घेण्यास सांगितले . या आढावा सभेला महसूल सहायक अधिकारी योगेश कोणापुरे, तंत्रस्नेही ऋषी सुरपाम, तंत्रस्नेही महादेव शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते.




