*सेवा आणि एकतेचे प्रतीक राष्ट्रीय सेवा योजना – श्री विजयजी मुकेवार
सुरेंद्र इखारे वणी :- दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद् घाटन वांजरी येथे पार पडले . संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीला अनुसरून शिबिराचे आयोजन करण्यात आले. गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. मा .अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय सेवा योजना गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर लगेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयजी मुकेवार यांनी साप्ताहिक वाचनालयाचे उद् घाटन केले. या शिबिराच्या उद्घाटन पर कार्यक्रमांचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विजयजी मुकेवार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना ही सेवा आणि संस्काराचे माहेरघर आहे, तसेच शहराकडे धावणाऱ्या तरुणांनी खेड्याकडे पाठ फिरवू नये गाव हे राष्ट्राचा पाया आहे आणि तरुणांनी या मातीशी आपला नातं टिकवून ठेवाव यासाठी प्रयत्न करावे असे मत आपल्या अध्यक्षिय मनोगतात व्यक्त केले, या शिबिराचे उद् घाटक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोकरावजी सोनटक्के यांनी मनोगतातून शिबिराला शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अनिलजी जयस्वाल उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रसाद खानझोडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शिस्त आणि व्यक्तिमत्व विकासाचे द्वार म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या पुरेपूर फायदा घेऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणावा असे आवाहन केले. वांजरी गावच्या सरपंच सौ अरूणा जेनेकार यांनी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला शुभेच्छा दिल्या. तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू कुंभारे, पोलीस पाटील सुनीता तेलतुबडे,जी. प शाळेचे मुख्याध्यापक गजानन भगत उपस्थित होते. तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालयातील डॉ. अभिजीत अणे, डॉ. स्वानंद पुंड, डॉ. करमसिंग राजपूत, प्रा. उमेश व्यास, डॉ. ज्ञानेश्वर खामणकर, तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आनंदजी नगराळे, संतोष चांदेकर, सुरेंद्र समर्थ, मनोज केळकर, वाजरी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री विकासजी जेनेकर व अमोलजी कुंभारे उपसरपंच ग्रामपंचायत वांजरी यांचे महत्त्वपूर्ण योगदान या शिबिरासाठी लाभले यांच्यासह ग्रामपंचायत वांजरी चे कम्प्युटर ऑपरेटर श्री विजयजी बोबडे , कमलाकर भाऊपाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ नीलिमा दवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश सांगून या सात दिवसाच्या शिबिरातील कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकेतून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ विकास जूनगरी यांनी केले . तर आभार प्रदर्शन डॉ. नीलिमा दवणे यांनी केले . विद्यार्थी प्रतिनिधी दुष्यंत खामणकर याने प्रज्वलित मशाल घेऊन विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केले. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला संजय बिलोरिया यांचे सहकार्य लाभले.