Sunday, January 26, 2025
Google search engine

बसपाच्या वतीने अमित शहा विरोधी संविधान चौकात धरणे

बसपाच्या वतीने अमित शहा विरोधी संविधान चौकात धरणे
नागपूर ( जयंत साठे ) संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ आज नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने संविधान चौकात धरणे निदर्शने करण्यात आली. अमित शहा यांनी संसदेमध्ये बहुजनांचे मसीहा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला. त्यामुळे त्यांनी जनतेची सार्वजनिक रित्या माफी मागावी. व पार्लमेंटच्या कामकाजातून ते शब्द वगळावेत यासाठी दिवसभर मनुवादी अमित शहा व भाजपा सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देऊन त्यांचा निषेध करण्यात आला.

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहण मायावतीजी यांच्या दिशा निर्देशानुसार राष्ट्रपती महोदया यांच्या नावाने नागपूर जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेशचे पृथ्वी शेंडे, नागोराव जयकर, ठाकरे, उत्तम शेवडे, जिल्ह्याचे योगिराज लांजेवार, रंजना ढोरे, राजकुमार बोरकर, गेडाम, चंद्रशेखर कांबळे, इब्राहिम टेलर, रामकुमार गोणेकर, उमेश मेश्राम, रोहित वालदे, प्रिया गोंडाने, तारा गौरखेडे, मंगला लांजेवार, सुमंत गणवीर, गौतम पाटील यांचा समावेश होता.

संविधान चौकात झालेल्या धरणे निदर्शने कार्यक्रमात कृष्णाजी बेले, राहुल सोनटक्के, सुनंदा नितनवरे, वर्षा सहारे, अभिलेश वाहाने, भीमराव गजभिये, नरेश वासनिक, भंते संघरत्न, आकाश खोब्रागडे, सावलदास गजभिये, अंकित थुल, सुरेंद्र डोंगरे, मुकेश मेश्राम, पुनेश्वर मोटघरे, अजय उके, जितेंद्र पाटील, सुमित जांभुळकर, विकास नारायणे, सदानंद जामगडे, रुपराव नारनवरे, आशिष फुलझेले, संदीप मेश्राम, जितेंद्र घोडेस्वार, विक्रांत मेश्राम, महेश वासनिक, सुधाकर सोनपीपळे, बुद्धम राऊत, मनोज सांगोळे, गौतम गेडाम, साधना काटकर, माया उके, प्रिया ढोके, कविता लांडगे, नितीन वंजारी, राजेश फुलझेले, अनिल मेश्राम, राजेंद्र सुखदेवे, अमित सिंग, राजू चांदेकर, सतीश शेळके, करुणा डहाट, संगीत इंगळे, ताराचंद गोडबोले, करुणा मेश्राम, भास्कर कांबळे, एड वीरेश वरखडे, प्रवीण पाटील, चंद्रशेखर रंगारी, उत्तम गजभिये, चंद्रशेखर पाटील, प्रीतम खडतकर, अभय डोंगरे, सुनील बारमाटे, शशिकांत मेश्राम यांचे सहित अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा जाहीर निषेध केला.

आज दक्षिण भारतातील महान समाज क्रांतिकारक पेरियार रामस्वामी नायकर यांचा 51 वा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून या धरणे निदर्शने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संविधानाशी व बाबासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या काँग्रेस ला देशातून संपवून बसपा ने त्यांची औकात दाखवली तीच औकात भाजपला दाखवण्यात येईल असा इशारा याप्रसंगी बसपा नेत्याद्वारे देण्यात आला.

याप्रसंगी काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारत मारत अग्नीच्या स्वाधीन करून त्याला डायरेक्ट स्वर्गात पाठवले त्याची चर्चा फारच रंगली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular