Sunday, June 21, 2026
Google search engine

कायर येथील विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

कायर येथील विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयाचे प्रांगणात NCERT आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026 ला 21 जून हा बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात व आनंदी वातावरणात योगगुरू च्या मार्गदर्शनात यशस्वीपणे संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक योग गुरू सतीश घुले हे उपस्थित होते. याप्रसंगी योगगुरू सतीश घुले सरांनी सुर्यनमस्कारासह विविध प्रकारचे आसणे व प्राणायम घेतले. व योग दिवसाचे महत्व समजावून सांगितले तसेच मोबाईल च्या माध्यमातून उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांना प्रणायमाची धून व प्रार्थना गीत वाजविले. यावेळी जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे, सोनाली ठाकूर, रविकांत गोंडलावार,लक्ष्मीबाई निमसटकार, आकाश बोरूले, सचिन टोंगे, मधुकर कोडापे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular