भालरच्या विद्यालयात ” भव्य वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा”
सुरेंद्र इखारे वणी:- तालुक्यातील भालर येथील कै सांबशिव पाटील शिक्षण संस्था भालर द्वारा संचालित तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय भालर येथे दिनांक 27 ते 29 जानेवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे.
भालरच्या विद्यालयात 27 जानेवारीला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
28 जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा सकाळी 10.30ते 11.30 आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार ,तर अध्यक्षस्थानी विद्यमान आमदार संजयभाऊ देरकर, प्रमुख अतिथी कोठा व्यंकटा सुबाराव एमडी ,सूर्या सेम कंपनी, संस्थाध्यक्ष बालाजीपंत वरारकर, संस्थासचिव सुनील वरारकर, संचालक प्रवीण वरारकर, संचालक दौलत पिपराडे, मुख्याध्यापक मनोज वरारकर उपस्थित राहणार आहे.
उदघाटन सोहळ्यानंतर 12 ते 6 वाजेपर्यंत माजी विद्यार्थी परिचय मेळावा, संस्कृतिक कार्यक्रम, चहापान व स्नेहभोजन असणार आहे.
तसेच 29 जानेवारीला “आनंद मेळावा” चे उदघाटक मीनाताई वरारकर, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोज वरारकर तर सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळ्याचे उदघाटक रविभाऊ एम्बडवार, अध्यक्षस्थानी अरुण वरारकर, प्रमुख उपस्थिती संस्थासचिव सुनील वरारकर, हुशेन बाशा, संचालक नामदेव गोहोकार उपस्थित राहणार आहे.
तेव्हा विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या पालकांनी व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक मनोज वरारकर, सहायक शिक्षक लक्ष्मण ढेंगळे, राजेंद्र खिरटकर , अविनाश वरपटकर, बंडू अडबाले, नथ्थु जेऊरकर, कैलास खुजे, कविता लांडे, नितीन उपरे, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी तुकाराम ढेंगळे, भास्कर हेपट, सुरेश हेपट, धनराज वाघमारे, बंडू धोंगडे, व विद्यार्थी शालेय मंत्रीमंडळानी केले आहे.