Tuesday, January 13, 2026
Google search engine

आमदार देरकरांनी घेतला भांदेवाडा भूमिगत खाणीतील थरारक अनुभव

आमदार देरकरांनी घेतला भांदेवाडा भूमिगत खाणीतील थरारक अनुभव

* चार तास घालविले खानीतील किर्र अंधारात

सुरेंद्र इखारे वणी :-वणी तालुक्यात वेकोलीच्या आठ कोळसा खाणी आहेत .त्यामुळे वणीतील युवकांना रोजगार देणारा सर्वात मोठा स्रोत आहे. मात्र भूमिपुत्रांना व नव्याने वेकोलीत नोकरी लागलेल्या युवकांना शिक्षा म्हणून त्याच्या कार्यक्षमतेची कसोटी तपासण्यासाठी त्यांना भांदेवाडा येथिल भूमिगत खाणीत नेमणूक दिल्या जाते. म्हणून या भूमिगत कोळसा खाणीत कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आमदार संजय देरकर यांना होती. त्यामुळे त्यांनी शनिवारी ८ फेब्रुवारीला प्रत्यक्ष भांदेवाडा भूमिगत खाणीत उतरून समस्या जाणून घेतल्या.

आमदार संजय देरकर हे शनिवारी दुपारी एक वाजता वेकोलीचे अधिकारी तसेच त्यांचे सहकारी गणपत लेडांगे, दिलीप भोयर, वेकोलीच्या सुरक्षा बोर्ड चे सदस्य सुनिल मोहीतकर ,असलम खान,संघदीप भगत, भगवान मोहिते, देवेंद्र बच्चेवार, प्रेमा धानोरकर, तसेच इतर कार्यकत्यासह खाणीत उतरले. खाणीतील किर्र अंधार व चढ उताराचे रस्ते पार करीत त्यांनी तब्बल चार तास खाणीत पायी प्रवास केला.

वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम. संगीवारेड्डी ,क्षेत्रीय उपप्रबंधकक सय्यद नाझीमुद्दीन, क्षेत्रीय कार्मीक प्रबंधक ओ. पी. करोले, खाण व्यवस्थापक राहुल गवई यांनी खाणीतील सर्व कामकाजाची माहिती दीली. तसेच वेकोलीतर्फे आमदार देरकर यांचे स्वागत करण्यात आले. भूमिगत कोळसा खाणीला प्रत्यक्ष भेट देणारे देरकर हे पहिलेच आमदार असल्याने खाण व्यवस्थापनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

खानीबदल माहिती देताना उपक्षेत्रीय प्रबंधक सय्यद नाझोमुद्दीन म्हणाले की वणी विभागात प्राचीन काळी एखाद्या नदीचे खोरे असावे त्याचेसभोवार घनदाट जंगले असावे. काळाच्या ओघात भौगोलीक उलथापालथ होऊन जंगल जमिनीखाली दाबले गेले व त्यापासुन वणी परिसरात भूगर्भात प्रचंड असे कोळशाचे थर निर्माण झालेआहे.

भांदेवाडा भूमिगत खाणीला 30 ते ३५ वर्ष झाली. मात्र अजुन येथिल २५ टक्केही कोळसा बाहर काढला गेला नाही. या खाणीत तीन पाळ्यात कामगार काम करतात. प्रत्येक पाळीतुन ५० ते ६० टन कोळसा बाहेर काढला जातो. या खानीतुन मिळणारे उत्पादन खर्चापेक्षा अधिक आहे. मात्र भूमिगत खाणीचे एक मॉडेल टिकविण्यासाठी वेकोलि प्रशासन ही भूमिगत खाण सुरु आहे असे राहूल गवई यांनी स्पष्ट केले. ही कोळसाखाण जमिनीपासुन १०० ते १५० मीटर खोलीवर आहे .परंतु सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत.

आमदार देरकर यांनी खाणीत काम करणारे कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व कोळसा कसा काढला जातो यांचे प्रात्यक्षिकही डोळ्याने बघीत‌ले. खाणीत जाने -येणेचा त्रास सोडला तर बाकी कोनत्याही समस्या नसल्याचे कामगारांनी आमदार देरकर यांना सांगीतले.

वणी खाणीतील प्रत्यक्ष कामकाज बघुन डोळ्याचे पारणे फीटले.फक्त खाणीत जाणे-येणे साठी एकच प्रवेशद्वार आहेत ते खटकले. प्रवेशद्वार दोन-तीन करावे अशी मागणी मी केंद्रीय खानमंत्र्याकडे करणार आहे.सय्यद नाझीमुद्दीन,क्षेत्रीय उप प्रबंधक, भांदेवाडा भूमिगत खाण

आमदार संजयजी देरकर यांनी आमच्या भूमिगत खाणीला भेट देऊन सुरक्षीततेची माहीती घेतली.कामगारांचा उत्साह वाढविला याबद्दल मला आनंद झाला. ते वेकोलिच्या कामकाजाबाबत सकारात्मक विचार करणारे नेते वाटले. आम्हाला वेळोवेळी त्यांचे सहकार्य अपेक्षीत आहे.

कामगारांच्या आपुलकीने समस्या जाणून घेणारे पाहिले आमदार – कामगार नेते सुनील मोहितकर

वेकोलीतील कामगारांच्या अनेक समस्या आहे. त्यातल्या त्यात भूमिगत कोळसा खाणीत काम करणे म्हणजे जीव मुठीत घेवून काम करणे आहे. परंतु त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भूमिगत खाणीत जावून त्यांच्या समस्यांची जाणिव करून घेणारे आमदार संजय देरकर हे पहिले लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्या या कृतीने वेकोली कामगारामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular