विदर्भस्तरीय सब -ज्युनिअर कबड्डी स्पर्धेत वणीच्या विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थिनींची निवड
विद्यार्थिनींचे क्रीडा क्षेत्रात सर्वत्र कौतुक
सुरेंद्र इखारे वणीः येथील विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थीनी जानवी प्रकाश ठाकरे, नव्या श्रीराम पिदूरकर, श्रद्धा प्रेमराज देशमुख यांची 35 व्या विदर्भस्तरीय सब जुनिअर कबड्डी स्पर्धेत 14 वर्षाआतील यवतमाळ जिल्हाच्या मुलींच्या संघात निवड करण्यात आली असून ही कबड्डी स्पर्धा बल्लारशा येथे होणार आहे.
बल्लारपूर येथे होणाऱ्या स्पर्धेत यवतमाळ, अकोला, अमरावती,भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्याच्या संघाने सहभाग नोंदविला. यवतमाळ जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडू वणी येथील नामवंत नृसिंह व्यायाम शाळा येथील प्रशिक्षक कुणाल ठोंबरे यांच्या प्रशिक्षणात नियमित सराव करीत असून त्या आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व मार्गदर्शकांना देतात.तसेच श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळाच्या अध्यक्षा ताराबाई ठावरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.शंकररावजी व-हाटे,सचिव अविनाश भाऊ ठावरी, संचालिका वंदनाताई व-हाटे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आसकर तथा शाळा प्रभारी नवनाथ नगराळे , गंगाधर गेडाम, शारीरीक शिक्षक शैलेश नांदेकर, संतोष बेलेकार यांनी विद्यार्थ्यांच्या निवडीबाबत त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीबाबत वणीच्या क्रीडा क्षेत्रात सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.