Tuesday, January 13, 2026
Google search engine

मेट्रो रेल्वे देखभाल अभावी नागरिकांना नाहक त्रास

मेट्रो रेल्वे देखभाल अभावी नागरिकांना नाहक त्रास
नागपूर ( जयंत साठे ) मेट्रो रेल्वे देखभाल दुरुस्ती अभावी (मेन्टेनंस )वाहतूक मार्गावरील रहिवासी, विद्यार्थी, आजारी यांना ध्वनी प्रदूषणामुळे जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे.
नागपूर मेट्रो रेल मार्ग परिसरातील रहिवासी, आजारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना ध्वनी प्रदूषणामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
उंचावर मेट्रो मार्ग असून आजूबाजूच्या सोसायटी व त्यातील रहिवासी, दवाखाने इत्यादींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाला मेट्रो देखभाल विभाग (मेंटेनन्स) जबाबदार आहे.
महत्त्वाचे म्हणजे मेट्रो रेलने विशिष्ट ठिकाणी व्ही.आय.पी. क्षेत्रात साउंड बॅरिअरची व्यवस्था केलेली आहे.
मार्गातील रहिवासी परिसरात ही व्यवस्था का नाकारण्यात आली हे एक न उलगडणारे कोडे झाले आहे.
मेट्रो फेज टू अंतर्गत पिवळी नदी ते कामठी पर्यंतच्या नवीन मार्गाचे काम प्रगतीत आहे. नवीन मेट्रो मार्गाच्या कामासाठी या रस्त्यावर असलेले विद्युत दिवे काढून टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे अंधार पसरून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. मेट्रो ने पुरेशी विद्युत प्रकाशाची व्यवस्था केलेली नाही. जागोजागी स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सीए रोड गोरोबा मैदान मेट्रो स्टेशनला आंबेडकर चौक मेट्रो स्टेशन असे नाव असून आंबेडकर शब्दा पुढे सन्मानाने डॉक्टर शब्द लावावे. इंदोरा चौक मेट्रो स्टेशन परिसरात पर्याप्त विद्युत दिवे, झेब्रा क्रॉसिंग रंगरंगोटी, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह वाहनतळ इत्यादीची व्यवस्था करण्यात यावी. सुरळीत व सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीची स्थापना करण्यात यावी. मेट्रो पुलावर ठिकठिकाणी मधमाशांचे पोळे दृष्टीपथात पडत आहेत यावर वेळीच दक्षता घेण्यात यावी.रहाटे चौक मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमी रोड मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात यावे.याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विदर्भ महासचिव बाळू घरडे यांच्या नेतृत्वात माननीय एम.डी श्री श्रावण हार्डीकर यांना देण्यात आले.
केलेल्या सूचनांच लवकरच दखल घेण्यात येईल असा आश्वासन श्री श्रावण हर्डीकर यांनी शिष्टमंडळाला दिले.
याप्रसंगी बाळू घरडे, सरोज मेश्राम, मुकुंद पाटील, राहुल मेश्राम, अमोल लोखंडे, शुभम घरडे, किशोर सांगोडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular