Tuesday, May 20, 2025
Google search engine

लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारीचे आयोजन.

लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारीचे आयोजन.

सुरेंद्र इखारे वणी
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी विद्यार्थी विकास विभाग द्वारा विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी तीन दिवसीय युवा भरारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. २८.०२.२०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली तथा सर्व संचालक गणांच्या उपस्थितीत
उद्घाटन समारोह संपन्न होईल.
पहिल्या दिवशी
रांगोळी स्पर्धा,एकल नृत्य स्पर्धा
पुष्पगुच्छ सजावट स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा तथा कॅरम स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. ०१.०३.२०२५ वादविवाद स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा,रील मेकिंग स्पर्धा, घेण्यात येतील तसेच बुद्धिबळ स्पर्धा आणि कॅरम स्पर्धा यांच्या पुढील फेऱ्या संपन्न होतील.
रविवार, दि. ०२.०३.२०२५ रोजी समुह नृत्य स्पर्धा,सुगम संगीत (एकल गायन)
बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा
,आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला असून शेवटी समारोपीय कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ अभिजित अणे यांच्या नेतृत्वात आणि प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात प्रा. किशन घोगरे ,
डॉ. नीलिमा दवने,डॉ. विकास जुनगरी,प्रा. उमेश व्यास,डॉ. गुलशन कुथे प्रा. महादेव भुजाडे हे महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम पूरक उपक्रमांचे समन्वयक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे तथा युवा भरारीचे समन्वयक डॉ अभिजित अणे यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular