महादीप उपक्रमात वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ढाकोरी च्या दोन मुलींना विमानप्रवासाची संधी
वणी पंचायत समितीने रोवला मानाचा तुरा
जिल्हापरिषद शाळेच्या चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ढाकोरी या शाळेच्या मुलींनी महादीप परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून यवतमाळ जिल्ह्यात वणी पंचायत समितीने विमानप्रवासाची संधी घेतली.
यवतमाळ जिल्हा परीषद अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रकाशवाट दाखविण्यासाठी, स्पर्धा परीक्षेत ग्रामीण विध्यार्थी सदोदित यशस्वी व्हावे या हेतूने घेण्यात आलेल्या महादिप परीक्षेत जिल्हा परीषद वरीष्ठ प्राथ. शाळा ढाकोरी ता.वणी जि. यवतमाळ च्या कु.दिक्षा मांडवकर व कु.कालेश्वरी घोरपडे या विद्यार्थिनी घवघवीत यश मिळवून विमानवारी साठी पात्र झाल्या. महादीप असा एक उपक्रम आहे जिथे शालेय अभ्यासक्रमाचे पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची क्षमता वाढविल्या जाते . यामध्ये ग्रामीण भागातील मुली यशस्वी झाल्या याबद्दल या चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज दिनांक 21मार्च 2021 रोजी यवतमाळ येथे बक्षिस समारोह कार्यक्रमामध्ये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून त्यांचे कौतुक कऱण्यात आले.विध्यार्थीना प्रेरित करणारे वणी पंचायत समिती चे गटशिक्षण अधिकारी स्नेहदीप काटकर सरांनी पात्र विद्यार्थीचे कौतुक केले व शैक्षणिक सहलीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच तालुका समन्वयक . विनोद नासरे सर यांचाही सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बालाजी बीडकर सर, विषय शिक्षिका कु. मीनल बेझलवार मॅडम, सहायक शिक्षिका कु. माधुरी कावडे मॅडम या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक सहलीला भरभरून शुभेच्छा दिल्या