”मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा”अभियानात न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवटचा दुसरा क्रमांक
या अभियान स्पर्धेत उत्कृष्ठता सिद्ध केली
सुरेंद्र इखारे वणी :- महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा’ अभियानात वणी तालुक्यातील पुनवट येथील न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवट या शाळेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धन, अंतर्गत कला व क्रीडा गुणांचा विकास, सार्वजनिक स्वच्छता व चांगले आरोग्य हे सर्व निकष पूर्ण करीत ग्रामीण भागातील या शाळेने संपादन केलेले यश उल्लेखनीय आहे.
शाळेच्या या यशात शिक्षण प्रसारक समितीचे कार्यकारी अध्यक्ष श्री जयसिंगरावजी गोहोकार, सहसचिव महादेवरावजी वल्लपकर ,संचालक मंडळ व सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले. शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळेचा यशस्वी प्रवास सुरू असून तो कायम राखण्याचा निर्धार मुख्याध्यापक श्री.अनिल ढेंगळे यांनी व्यक्त केला.
शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. स्नेहदीप काटकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री हेडाऊ साहेब, श्री नगराळे साहेब, नासरे सर, केंद्रप्रमुख श्री,घोनमोडे साहेब श्री सुरज चौधरी साहेब यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.