क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी अभिवादन
नागपूर ( जयंत साठे) सामाजिक न्याय विभागामार्फत दि.8 एप्रिल २०२5 ते 14 एप्रिल २०२5 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून अभिवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूरचे बाबासाहेब देशमुख यांनी क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी वित्त व लेखा विभागाचे सहायक संचालक अतुल वासनिक हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती, लेखाधिकारी श्रीमती किरण चांदेकर, भारत मेश्राम, मनोहर उचे, दिनेश सुखदेवे, छाया बागडे, अनामिका बाराहाते, निलोफर अली, आरती सुखदेवे, ज्योती मानके, अर्चना सातघरे, सारीका बोरकर, जयश्री धवराळ, निखिल मेश्राम, शैलेश चव्हाण, संतोष दहागावकर, गणेश बच्छे, हेमंत खवशी, गजानन शेळके, अमित कांबळे, रीतेश भारती इ. व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.