पुनवटच्या न्यू इंग्लिश मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सुरेंद्र इखारे वणी- तालुक्यातील पुनवट येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये विश्वरत्न, महामानव,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल ढेंगळे हे होते,प्रमुख पाहूणे दयालाल निकुबे,सुधाकर पोटदुखे,संजय पिंपळकार, सुभाष खुजे उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद भगत यांनी केले तर,वर्ग 5 वीमधून हर्षल कुरेकर, वैभव वांढरे, शिवम इंगोले संचिता हेपट,टिनेश पिदुरकर, जान्हवी भोंगळे,वैष्णवी किन्हेकार, स्वराज टिपले,नव्या हनुमंते, वर्ग 6वीमधून नैतिक ढोरे,किशोर भगत, राज राजुरकर, गुंजन उगे,कृष्णाली पचारे,श्रध्दा उकीनकर, वर्ग 7वीमधून हिमांशु गायकवाड, अक्षरा मालेकर, वेदांत करमणकर, ऋची बोढाले,वर्ग 8वीमधून अस्मिता इंगोले, नेहा बुरडकर, तनुश्री गानफाडे,अनुश्री मोवाडे,नंदिनी वांढरे, वर्ग 9वीमधून समिक्षा काळे,मयूरी बोबडे,अनुष्का पचारे,नेहा इंगोले,सावली पचारे,कश्मिरा बोबडे,ऋतुजा कुळसंगे,विवेक कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद भगत यांनी मानले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बाळकृष्ण इंगोले यांनी सहकार्य केले.