रिपब्लिकन पक्षाचे नेते हरिदास टेंभूर्णे यांचे दुःखद निधन
नागपूर ( जयंत साठे ) रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे निष्ठावान सहकारी आंबेडकरी चळवळीतील एक समर्पित सेनानी,माजी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते,हरिदास टेंभुर्णे,यांचे आज दिनांक 13 एप्रिल,2025,रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे वय 92 वर्षाचे होते,त्यांचे मागे तीन मुले तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025, ला दुपारी 12 वाजता त्यांचे निवासस्थान वैशाली नगर चौक स्थित,येथून निघून वैशाली दहन घाट येथे अंत्य संस्कार करण्यात आले आहे.