डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम
नागपूर ( जयंत साठे ) समता लेआऊट महिला मंडळ, अंबाझरी रोड नागपूरच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या समारोहात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांच्या अध्यक्षतेखाली विख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉ. संजय रामटेके यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर विद्रोही संत कबीर हे नाटक लेखक , दिग्दर्शक, संजय जीवने यांनी सादर केले. बेकिंग स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा यातील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर डॉ. संजय रामटेके, डॉ. धनराज डाहाट, संजय जीवने, सांची जीवने, महिला मंडळाच्या अध्यक्ष अर्चना बनसोड, डॉ. स्मिता जगदीश, डॉ. हर्षला जांभूळकर, नलिनी डाहाट, माया फुलझेले, विशाखा माटे, स्मिता बागडे प्रामुख्याने उपस्थित होते. वंदना बांभोरे यांनी मंच संचालन केले आणि माया फुलझेले यांनी आभार मानले.