Tuesday, May 13, 2025
Google search engine

सावी बुलकुंडे चे बसपाने अभिनंदन केले

सावी बुलकुंडे चे बसपाने अभिनंदन केले

नागपूर ( जयंत साठे ) यूपीएससी परीक्षेत 517 वा रँक मिळवलेल्या ओंकार नगर निवासी सावी श्रीकांत बुलकुंडे हिचे निवासस्थानी जाऊन बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे व सहकाऱ्यांनी पक्षाच्या वतीने भारतीय संविधान व बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ भेट देऊन सावी व तिच्या परिवाराचे स्वागत केले. स्वागत करताना सावी ने भारतीय संविधानानुसार व बाबासाहेबांच्या विचारानुसार समाज व देशहिताचे कार्य करावे असे आवाहन केले, त्याचे सावी ने समर्थन केले.

याप्रसंगी बसपाच्या जिल्हा प्रभारी रंजनाताई ढोरे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, विद्यार्थी नेते इंजि नितेश कांबळे, दक्षिण नागपूरचे प्रभारी नितीन वंजारी, अध्यक्ष जितेंद्र पाटील, ज्योतिबा अलोणे, शामराव तिरपुडे, बामसेफचे भानुदास ढोरे, जीवन वाळके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ह्या सर्वांनी सावी बुलकुंडे व त्यांच्या परिवाराचे स्वागत करून समाजातील विद्यार्थी व युवकांनी यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular