Monday, August 10, 2026
Google search engine

डॉ. अभिजित अणे यांचा विद्यापीठात विशेष गौरव

डॉ. अभिजित अणे यांचा  विद्यापीठात विशेष गौरव
सुरेंद्र इखारे वणी    :-  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख तथा विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ.अभिजित अणे यांचा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ .मिलिंद बारहाते व महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
हैदराबाद येथील मौलाना आझाद उर्दू नॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये संपन्न झालेल्या आंतर विद्यापीठीय स्वरूपातील कव्वाली गायन या स्पर्धेमध्ये पंजाब, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, मेघालय इत्यादी १४ राज्यातून सहभागी झालेल्या चमूं मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त केलेल्या चमूचे संघ व्यवस्थापक म्हणून केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डाॅ महेंद्र ढोरे,कुलसचिव डाॅ अविनाश असनारे,सिनेट सदस्य डॉ. रवींद्र कडू तथा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे समन्यक डाॅ. राजीव बोरकर उपस्थित होते.
यानिमित्ताने सलग दुसऱ्या वेळी विद्यापीठ चमूचे समन्वयक स्वरूपात मिळालेला बहुमान आणि सुवर्णपदक स्वरूपातील अपूर्व गौरव प्राप्त केल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या सह सर्व संचालक गण आणि आजीव सदस्य तथा प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याद्वारे डॉ. अभिजित अणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular