कायरच्या महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा 81 टक्के निकाल
तेजस्विनी गिरटकार विशेष प्राविण्यात
सुरेन्द्र इखारे वणी :- नुकताच बारावीचा निकाल ऑनलाइन सोमवारी दिनांक 5 मे 2025 रोनी दुपारी जाहीर करण्यात आला यात यावर्षी सुद्धा मुलींनी बाजी मारली आहे विशेषतः कायरच्या महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाने याहीवर्षी सुद्धा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ. महाविद्यालय कायर ने १२वीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत ८१.४८%टक्के निकाल लागला असुन त्यामध्ये विशेष प्राविण्यात १, तर प्रथम श्रेणीत७,व्दिर्तीय श्रेणीत२२विद्यार्थी असुन कायर परीसरातुन कु.तेजस्वीनी संतोष गिराडकर हिने ७९.३३टक्के गुण घेवुन विशेष प्राविण्यात श्रेणीत स्थान मिळविलै.तर कू. समीक्षा शंकर डवरे७३.८३% , कु.समीक्षा सोयाम,६७%, अमृता पळकंटिवार६६.३३%, सुजल टेकाम६३.६७%, प्रेम पंधरे६३.५० या विद्यार्थ्यानी भरीव यश संपादन केलेत.संस्थेचे अध्यक्ष मा.कुंडलीक रामा गायकवाड, युवराज गायकवाड , मा.गजानन मा.मांडवकर सर प्राचार्य धोंगडे मॅडम ,प्राध्यापक तसेच शिखकेत्तर कर्मचारी ह्यांनी विद्यार्थायाचे कौतुक केले. विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक,आई वडिलाना दिले आहे