Monday, January 12, 2026
Google search engine

रघुवंशम् लेखमालिकेची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.

रघुवंशम् लेखमालिकेची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.

सुरेंद्र इखारे वणी   :-  लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभागप्रमुख तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा .स्वानंद गजानन पुंड यांच्या विक्रमी लेखणीद्वारा दिनांक १७ डिसेंबर २०२३ पासून नित्य स्वरूपात सुरू असणाऱ्या कविकुलगुरू कालिदासांच्या दिव्य महाकाव्य रघुवंशम् वर आधारित लेखमालिकेची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रम स्वरूपात नोंद घेण्यात आली आहे.
१७ मे २०२५ रोजी या लेख मालिकेत सातव्या सर्गातील दहाव्या श्लोकाच्या निरूपणासोबत या लेखमालिकेचे सलग ५०० भाग प्रसारित झाल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सातत्याबद्दल हा विक्रम नोंदवण्यात आलेला आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी डॉ.स्वानंद पुंड लिखित श्री गणेशोपासना या २१ ग्रंथात्मक ग्रंथ मालिकेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये, श्री शांकर स्तोत्र रसावली लेखमालिकेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये, गीर्वाण वाणी या त्यांच्या युट्यूब चॅनलची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट साठी लिहिलेल्या श्री गाणेश्वरी मनोबोध मालिकेची नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम स्वरूपात नोंद झालेली आहे.
या रघुवंशम् मालिकेत आजवर प्रकाशित झालेल्या सहा सर्गांवरील विवेचनांचे सहा ग्रंथ जळगाव येथील अविरत प्रकाशनाच्या द्वारे प्रकाशित झाले असून या योजनेत १४०० वर श्लोकांचे निरूपण आणि १९ ग्रंथ प्रकाशित होणार आहेत.
संस्कृत आणि संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठीच हा विक्रम अतीव अभिमानाचा विषय असून याबद्दल डॉ. स्वानंद गजानन पुंड यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular