Tuesday, January 13, 2026
Google search engine

*राजमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा*

*राजमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा*

त्रिशताब्दी जयंती शासन- प्रशासनाच्या वतीने संपूर्ण भारतभर साजरी होत आहे.

ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन

सुरेंद्र इखारे वणी   :-   राजमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समिती वणी, मारेगाव, झरी द्वारा आयोजित त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा 2025
आयोजित करण्यात आलेला आहे. या वर्षी 31 मे 2025 रोजी लोकमाता राजमाता अहिल्यामाई होळकर यांचा 300 वा जन्मोत्सव अर्थात त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा करण्याचे अहोभाग्य आपणा सर्वांना लाभलेले आहे. उत्तम प्रशासक निष्पक्ष न्याय व लोककल्याणकारी कार्यासाठी अहिल्यामाई होळकर इतिहासात अजरामर झालेल्या आहेत. अनेक जनसेवेची कार्य, धर्मार्थकार्य केल्यामुळे लोक त्यांना पुण्यश्लोक लोकमाता मातोश्री आईसाहेब म्हणून अत्यंत आदराने गौरवितात. त्यांची त्रिशताब्दी जयंती शासन- प्रशासनाच्या वतीने संपूर्ण भारतभर साजरी होत आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 29 मे 2025 गुरुवारला वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा ही सकाळी 11 वाजता खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृह वणी तर दिनांक 30 मे 2025 शुक्रवारला रक्तदान शिबिर व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी 8 ते  सायंकाळी 10 वाजेपर्यंत खंडोबा-वाघोबा देवस्थान वणी  येथे आयोजित केलेला आहे, तर दि. 31 मे 2025 ला सायंकाळी 4 ते 7 पर्यंत भव्य शोभायात्रा व बाईक रॅली तर सायंकाळी 7 वाजता त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अभिवादन सोहळा शेतकरी मंदिर वणी येथे आयोजित केला आहे. याअभिवादन सोहळ्याचे उद्घाटक मा. संजय देरकर आमदार वणी विधानसभा क्षेत्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. श्रीकांत भगत अध्यक्ष त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा समिती तर प्रमुख व्याख्याते म्हणून मा. प्रा. संजय बोधे, सुप्रसिद्ध व्याख्याते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून मा. संजीव रेड्डी बोदकुरवार माजी आमदार वणी विधानसभा, मा. वामनराव कासावार माजी आमदार वणी विधानसभा व मा. विश्वास नांदेकर माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रदीप बोनगीरवार, मा. सुनील कातकडे, मा. विजय चोरडिया, मा. प्रा. पुरुषोत्तम पाटील, मा. अँड. दिलीप परचाके, मा. सौ. संगीता खाडे मा. शहाबुद्दीन अजानी, मा. प्रतिभा लोंढे हे उपस्थित राहणार आहेत. तरी या विविध कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा समिती व महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच वणी, झरी, मारेगाव, खंडोबा-वाघोबा देवस्थान चारिटेबल ट्रस्ट वणी, महाराज यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणी, राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंच वणी, धनगर अधिकारी/कर्मचारी संघ वणी, झरी, मारेगाव व समस्त समाज बांधवांचे वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular