Wednesday, April 29, 2026
Google search engine

विवेकानंद विद्यालयाचे गणित शिक्षक नवनाथ नगराळे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त*

*विवेकानंद विद्यालयाचे गणित शिक्षक नवनाथ नगराळे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त*

सुरेंद्र इखारे वणी : –    वणी पंचक्रोशीत प्रसिद्ध विवेकानंद विद्यालयाचे ज्येष्ठ गणित शिक्षक व सकाळ पाळीचे प्रमूख नवनाथ मनोहर नगराळे हे नियत वयोमानानुसार 31 मे 2025 रोजी जवळपास तीन दशके मनोभावे ज्ञानार्जनाचे कार्य करून सेवानिवृत्त होत आहे. विद्यालयाचा एक माजी विद्यार्थी त्याच विद्यालयातून सहाय्यक शिक्षक या पदावरून निवृत्त होत असतांना विद्यालयाला याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. *आदर्श शिक्षक, विवेकानंद विद्यालयाचे संस्थापक तथा माजी मुख्याध्यापक स्व. दे.मा.ठावरी गुरुजी* यांच्या आदर्श विचारसरणीचा वसा घेवून नवोदय, शिष्यवृत्ती सारख्या अवघड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच केले नाही तर अनेक होतकरू विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र ठरले. त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी शासकीय, खाजगी सेवेत विविध महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. विद्यालयाच्या बँड पथकाचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. न.म नगराळे सर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य सुद्धा भरीव स्वरूपाचे असून सिद्धार्थ वस्तीगृहाच्या माध्यमातून ते वणी परिसरातील ग्रामीण भागातील बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी तनमनधनाने सदैव प्रयत्नशील असतात एव्हना त्या विद्यार्थ्यांचे पालकत्वच त्यांनी स्विकारले आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी समाज घडविणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण केले. विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम, मेहनत करणाऱ्या सरांच्या पाठीशी अध्यापनाचा प्रदिर्घ अनुभव आहे.अशा या विद्यार्थीप्रिय,समाज शिल, विज्ञानवादी विचारसरणीच्या शिक्षकास सेवानिवृत्ती च्या विवेकानंद विद्यालय परिवाराकडून खूप खुप शुभेच्छा!💐💐💐 सेवानिवृत्तीपर आयुष्य सुखी, आनंदी,समृद्ध व निरोगी जावो हिच प्रार्थना.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular