Monday, January 12, 2026
Google search engine

वणी प्रक्षेत्राची रणधुमाळी 

   वणी प्रक्षेत्राची रणधुमाळी      

मतदानासाठी एस पी एम केंद्र ;  161 मतदार बजावणार हक्क 

सन्माननीय आमदार सुधाकर अडबाले  सर यांनी दिल्या परिवर्तन पॅनलला  यशस्वी होण्याच्या शुभेच्छा

 सुरेंद्र इखारे वणी – येथील वणी प्रक्षेत्र  खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक 7 जून 2025 ला होत आहे. या निवडणुकीत 161 मतदार एस पी एम मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

वणी तालुक्यातील वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक 7 जून 2025 ला होऊ घातली आहे. त्यामुळे वणीच्या प्रक्षेत्राचे वातावरण तापू लागले आहे. अशातच  सन्माननीय आमदार सुधाकर अडबाले सर यांनी परिवर्तन पॅनलला यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी पॅनल प्रमुख प्राचार्य सुधीर वटे, श्याम बोढे सर, दिवाकर नरुले सर, व सर्व उमेदवार उपस्थित होते. यावर्षीच्या निवडणुकीत मतदार संख्येत घट झाली असून. आज रोजी या निवडणुकीत 161 मतदार मतदान करणार आहे. यामध्ये 11 संचालकांची निवड होणार आहे. यात सर्वसाधारण मतदार संघातून सहा, महिला  मतदार संघातून दोन, अनुसूचित जाती मतदार संघातून एक, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून एक, तर इमाव मतदार संघातून एक अशी निवड होणार आहे. या पाचही मतदार संघात उभे असलेले उमेदवार चेतन गोवारदीपे, किशोर बोढे, राहुल ठेंगणे, घनश्याम पावडे दत्तू महाकुलकर , गणेश लोहे, कु वंदना शंभरकर, सौ सीमा सोनटक्के, संजय मडावी, सुरेंद्र इखारे, संतोष बेलेकार हे सर्व उमेदवार परिवर्तन पॅनलच्या गटातून विमान या चिन्हावर उभे आहे. या उमेदवारांची निवड 161 मतदार मतदान करून मतदानाचा हक्क बजावणार आहे.होऊ घातलेल्या  वणी प्रक्षेत्र खाजगी शालेया कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या  निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी एस डी मडावी व पिसाळकर साहेब व इतर कर्मचारी पाहणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular