*चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत PDBA च्या खेळाडूंनी गाजविले मैदान*
सुरेंद्र इखारे वणी :- येथील पवन ढवस बॅडमिंटन अँकडमी (PDBA) च्या खेळाडूंनी चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत विविध वयोगटात रोमहर्षक सामन्यात विजेतेपद खेचून आणले. स्वर्निल जुमनाके हा ९ वर्षा आतील मुलांच्या सिंगल मध्ये विजेता ठरला असून साई तुराणकर हा ११ व १३वर्षाआतील मुलांच्या सिंगल स्पर्धेमध्ये विजेता ठरला आहे. मुलींच्या १७ वर्षी आतील डबल्समध्ये कु. गार्गी पिसे, कु .तानी पोद्दार यांनी विजेतेपद पटकाविले आहे. अद्वय खाडे, सुहावी मुसळे, आरोही ढेंगळे, सक्षम पोद्दार, संप्रीत भगत, हार्वी उपरे यांनी सुद्धा आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सेमी फायनल पर्यंत मजल मारली. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्राफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. विजेते खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आईवडील व प्रशिक्षक पवन ढवस यांना देतात. वणी सारख्या छोटेखानी शहरातून बॅडमिंटन या खेळाचे नामवंत खेळाडू तयार होण्यासाठी PDBA चे प्रक्षिशक पवन ढवस सर नगर परिषद बॅडमिंटन हॉल वडगांव रोड येथे खेळाडूंकडून कठोर सराव करून घेत आहे. विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
बॅडमिंटन या खेळाच्या सुविधा आधी फक्त मुंबई, पुणे,नागपूर या महत्वाच्या शहराच्या ठिकाणी उपलब्ध असायच्या त्यामुळे ते खेळाडू आपल्या खूप समोर असायचे. परंतु आपल्याकडे आता हळू हळू अत्याधूनिक सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे बॅडमिंटन क्षेत्रात वणी परिसरातील खेळाडू समोर जात आहेत. भविष्यात एक तरी राष्ट्रीय खेळाडू वणीतून तयार व्हावा अशी ईच्छा प्रशिक्षक पवन ढवस यांनी याप्रसंगाने व्यक्त केली.सर्व वणी क्रिडाक्षेत्रात याप्रसंगाने उत्साहाचे वातावरण आहे.




