Wednesday, November 12, 2025
Google search engine

वणी प्रक्षेत्राच्या पतसंस्थेवर जय विकास पॅनलचा झेंडा 

वणी प्रक्षेत्राच्या पतसंस्थेवर जय विकास पॅनलचा झेंडा

सुरेंद्र इखारे वणी :    तालुक्यातील वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी मतदान करून झालेल्या मतमोजणीत विरोधकांचा धुव्वा उडवून जय विकास पॅनेलने 10  संचालक  निवडून आणले. जय विकास पॅनेलने परिवर्तन पॅनलचे पानिपत केले. माजी संचालक मंडळ व जय विकास पॅनलच्या प्रमुखांनी बालेकिल्ला राखण्यास सरशी राहली. 11 संचालकासाठी 7 जूनला  निवडणूक होऊ घातली असून आजच या संचालकांची मतमोजणी होऊन जय विकास पॅनेलचे 10 संचालकांनी दणदणीत विजय मिळवला. वणी प्रक्षेत्रातील माजी संचालक पदाधिकाऱ्यांनी 15 ते 20 वर्षांपासून असलेला  बालेकिल्ला आजही  या निवडणुकीने पुन्हा कायम राहिला आहे. जय विकास पॅनलचे नेतृत्व  माजी माजी संचालक पदाधिकारी व विद्यमान नेतृत्व मनोज वरारकर, अभय पारखी ,टेंभुर्डे  यांच्या नेतृत्वात एकतर्फी विजय मिळविला. या निवडणुकीत  प्रयत्नांची पराकाष्ठा करून एकतर्फी विजय संपादन केला या निवडणुकीत जय विकास पॅनलचे  विजयी उमेदवार सर्वसाधारण गटातून संतोष वसंतराव चिलकावार, नथ्थु मारोती जेऊरकर, आत्माराम नारायण ताजने, राजेंद्र नथ्थुजी देवतळे, प्रकाश देवराव देवाळकर, अरुण नारायणराव पहुरकर, इमाव गटातून भुपेंद्र पांडुरंग देरकर, अनुसूचित जाती गटातून अरविंद उद्धवराव तिरणकर , भटक्या जमाती गटातून विनोद पुंडलिक बुच्चे,  महिला गटातून गाथा विजय पिपराडे हे विजयी झाले असून एकमात्र महिला सौ सीमा सोनटक्के परिवर्तन पॅनलच्या निवडून आल्या आहेत.जय विकास पॅनलच्या संचालकांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular