Tuesday, January 13, 2026
Google search engine

सर्व विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल असे जास्त क्षमतेचे वसतिगृह निर्माण करा –

सर्व विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल असे जास्त क्षमतेचे वसतिगृह निर्माण करा –
– मा.ना. श्री. संजय शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
नागपूर ( जयंत साठे) आपल्याकडे बहुतांशी वसतिगृह हे 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता नवीन वसतिगृहाची निर्मिती ही कमीत कमी 150 ते 200 व जास्तीत जास्त 1000 क्षमतेचे निर्माण करा.वसतिगृह हे महाविद्यालयाच्या जवळपास निर्माण करा. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.
मा. ना.श्री. संजय शिरसाट, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे नागपूर विभागातील सर्व उपायुक्त व संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीत मा. मंत्री महोदयांनी समाज कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेतला. वसतिगृहाचा लाभ हा सर्व विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे असे निर्देश बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले. जात प्रमाणपत्र पडताळणी सिस्टिम अधिक गतीमान करा. जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळाले पाहिजे असे तत्परतेने कार्य करा. प्रत्येक अधिकाऱ्यांनी कार्य करतांना आपल्या विभागाविषयी व आपल्या कार्याविषयी चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे कार्य करा.
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये असे आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देश यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांनी दिले.
सदर बैठकीत डॉ. हर्षदिप कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच श्री. सुरेंद्र पवार, व्यवस्थापकीय संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर, डॉ. मंगेश वानखडे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर, डॉ. देवसूदन धारगावे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडारा, श्रीमती जया राऊत, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वर्धा, श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर, श्री. किशोर भोयर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया, श्रीमती आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा, श्री. विनोद मोहतूरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर, डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली, श्री. अंकुश केदार, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वर्धा, श्रीमती अंजली चिवंडे, संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडारा, श्री.सुखदेव कौरती, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. नागपूर, श्रीमती प्रतिभा भागवतकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. वर्धा, श्री.दिलीप खोटेले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. गोंदिया, श्री. धनंजय साळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. चंद्रपूर, डॉ. संघमित्रा कोल्हे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. भंडारा, श्री. चेतन हिवंज, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. गडचिरोली इ. अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular