डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्ककरिता उपोषण कर्त्यांचे सामाजिक न्यायमंत्री यांना साकडे
नागपुर ( जयंत साठे )
नागपुर सुधार न्यास द्वारा नारा येथे आरक्षित झालेल्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय पार्क झाले पाहिजे याकरिता समितीद्वारे सामाजिक न्यायमंत्री यांनी दखल घेउन सदर पार्क निर्माण करावा अशी मागणी करण्यात आली.
सदर पार्क करीता नागपुर सुधार न्यास द्वारा 1996 साली नारा येथील 130 एकर क्षेत्रावर पार्क करीता आरक्षीत करण्यात आले होते,जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भूमाफिया च्या दबावाखाली येऊन नागपुर सुधार न्यास द्वारा सदर प्रस्तावास प्रशासकीय अधिकारी यांच्याद्वारे आजतागायत दुर्लक्षित करण्यात आलं, सदर आरक्षित जागेवर पार्क चं झाला पाहिजे याकरीता गेल्या पंचवीस वर्षांपासून स्थानिक नागरीकांकडुन मागणी होत आहे परंतु त्या काळात असलेल्या उदासिन लोकप्रतिनिधी मुळे सदर पार्क आजतागायत निर्माण झालेला नाही, तेव्हा सदर डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क झाले पाहिजे, याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क समिती अध्यक्ष चंदू पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर प्रकार उजेडात आणला. या बाबींची दखल घेऊन परिसरात असलेल्या सामाजिक कार्यकर्ते व महिला सातत्याने 272 दिवसांपासून उपोषण करत आहेत, जर हा पार्क लवकर निर्माण झाले नाही तर समितीचे अध्यक्ष चंदू पाटील व महिला सदस्य यांनी आमरण उपोषण करु पण पार्क निर्माण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा संकल्प करण्यात आला असे मंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिले.
यादरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय सीरसाट हे नागपूर येथे आले असता, सामाजिक न्याय भावनेने आपण हा पार्क निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन आपल्या शासनाच्या कार्यकाळात पुर्ण करावा अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री संजय सीरसाट यांच्याकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क समितीव्दारे करण्यात आली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष चंदू पाटील, गजानन जांगडे,राजेश पाटील, अजय खोब्रागडे,रवी चव्हाण, प्रफुल्ल खोब्रागडे, शंकर सोमकुवंर,विलास शेवाळे, तसेच गेल्या दहा महिन्यापासून सातत्याने उपोषण कर्त्या महिला यमुना रामटेके,रेखा खोब्रागडे, शशिकला चालखुरे, विजया पाटील,वनीता वालदे,अल्का रक्षित,जिजा रामटेके,भारती वानखेडे,वत्सला बेले, वंदना सहारे आशा डहाट,सुनीता सांगोळे, बेबीताई गजभिये,चंदा वाघमारे,सुषमा कांबळे, तसेच करणं यादव, रोशन यादव, सतीश गौर,सरोज मेश्राम,देविसिंग, हर्ष भंडारे, रोहीत भारतकर,मुकुल वासनिक,बालु भागेश्वर, भिमराव दाभाडे यांचेसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन येत्या काळात संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करून पार्क निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल. असे
सामाजिक न्यायमंत्री संजय सीरसाट यांनी सांगितले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क निर्माणाकरिता प्रशासकीय यंत्रणा वेळ खाऊपणा धोरणांचा अवलंब केल्यास येणाऱ्या काळात आमरण उपोषण करण्यात येइल, व हे आंदोलन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येइल. असे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क समितीचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी कळविले आहे.





