Monday, January 12, 2026
Google search engine

ऍड. निलेश चौधरी यांची भारतीय जनता पक्ष वणी शहर अध्यक्षपदी नियुक्ती.

ऍड. निलेश चौधरी यांची भारतीय जनता पक्ष वणी शहर अध्यक्षपदी नियुक्ती.
उत्कृष्ट संघटन कौशल्याचा लाभ भाजपास होणार
भाजपाची आक्रमक रणनीती
सुरेंद्र इखारे वणी     :-  येथील सुप्रसिद्ध जेष्ठ विधीज्ञ ऍड. निलेश माया महादेवराव चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा जिल्हा अध्यक्ष ऍड. प्रफुल चौहान यांनी ही नियुक्ती करुन पक्षाची शहरातील धुरा त्यांच्यावर सकारात्मक अपेक्षेने सोपवीली आहे. पक्ष संघटन व निवडणुकीत भाजपला विजयी करण्याच्या दृष्टीने त्यांची नियुक्ती ही निर्णायक ठरेल त्यांच्यातील संघटन कौशल्य, निर्णायक भूमिका, आक्रमक निर्णय क्षमता यामुळे पक्षाला मोठी भरारी प्राप्त होणार आहे. वणी शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍड. निलेश चौधरी त्यांच्या नियुक्तीने पक्षास बळकाटी प्राप्त होईल व नव्या जोमाने पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत यश संपादन करेल अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्या कडून व्यक्त केल्या जात आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा उपयोग पक्षास होईल अशी अपेक्षा कार्यकर्ते बाळगून आहे. त्यांचा समाजातील प्रत्येक घटकासोबतचा संपर्क दांडगा असून सर्व समावेश वृत्तीमुळे ते एक आवडते व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहे. त्यामुळे पक्ष बांधणी व विस्ताराकरीता पक्षास उपयोग होणार आहे. ऍड. निलेश चौधरी हे रॉयल फाऊंडेशनचे अध्यक्ष असून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून एक नवीन पायंडा सामाजिक कार्यात निर्माण केला आहे.
त्यामुळे सर्वांना हवे हवेसे वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकडे धुरा आल्यामुळे याचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षास मदत होईल असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकीय घडमोडी मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या नियुक्ती करिता श्री. हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी आयोग , श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, , माजी आमदार, श्री. तारेंद्र बोर्डे ,माजी जिल्हाध्यक्ष, विजय चोरडिया, संजय पिंपळशेंडे, रवि बेलुरकर यांनी एड निलेश चौधरी यांचे अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular