Tuesday, January 13, 2026
Google search engine

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त कीर्तन महोत्सव

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त
कीर्तन महोत्सव
सुरेंद्र इखारे वणी
आषाढी एकादशी निमित्त दि.५ व ६ जुलै रोजी
टागोर चौकातील रंगारी पुरा येथील विठ्ठल रुक्मिणी
मंदिरात कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दि. ५ जुलै शनिवार रोजी सायंकाळी ६.३०वाजता नागपूर येथील नामवंत कीर्तनकार
माधवबुवा धुमकेकर यांचे कीर्तन आयोजित असून
रविवार दि.६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता उत्कृष्ट
कीर्तनकार या पुरस्काराने सन्मानित सौ.मृण्मयी
कुळकर्णी(, नागपूर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ
श्रोत्यांना होणार आहे.त्या नंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या
सत्काराचे व जैताई भजन मंडळाच्या भजनाचे
आयोजन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीच्या आनंदात भर टाकणाऱ्या
या सर्व कार्यक्रमांना बंधुभगिनींनी बहुसंख्येने उपस्थित
राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular