Wednesday, April 22, 2026
Google search engine

विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षित वाहतुक याबाबत ठाणेदार माधव शिंदे यांचे मार्गदर्शन

विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षित वाहतूक याबाबत ठाणेदार माधव शिंदे यांचे मार्गदर्शन

सुरेंद्र इखारे वणीः तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद, खासगी माध्यमिक अनुदानित, इंग्रजी माध्यमाच्या, अंशतः अनुदानित अशा विविध शाळातील मुख्याध्यापक, प्राचार्य याना आज दिनांक 4 जुलै 2025 रोजी शिरपूर पोलीस स्टेशनच्या सभागृहात विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षित वाहतूक या संदर्भात ठाणेदार माधव शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले.

   शाळेचे शैक्षणिक सत्र 23 जून 2025 पासून सुरू झाले असून. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  शाळेत येणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे ऑटो, स्कूल बस, खाजगी बस, महामंडळाचे वाहनाने शाळा व महाविद्यालयात ये जा करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केली अशी माहिती विचारून त्या संदर्भात उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कारण  शासनाचे आदेशानुसार वरिष्ठ अधिकारी कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी जाहीर केलेल्या एस.ओ.पी. प्रमाणे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी याबाबत बैठकीमध्ये सूचना व मार्गदर्शन केले. त्यामुळे तात्काळ शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांनी सभेचे आयोजन करून शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार मार्गदर्शन केले व त्यांनी सभेत उपस्थित असणाऱ्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना  आपण दोन दिवसात काय कार्यवाही केली या संदर्भातील अहवाल मागितला आहे. सुरक्षित वाहतुकीचे संदर्भात मार्गदर्शन करत असताना वाहतूक करणाऱ्या  वाहनाचे कागदपत्रे अद्यावत ,प्रत्येक वाहनाचा विमा, फिटनेस परमिट अद्यावत असावे, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नये, चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, अशा सूचना केल्या. तसेच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम सांगितले पाहिजे असे सुध्दा सभेत सांगितल्या गेले. तसेच शाळा महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे चरित्र प्रमाणपत्र, सी सी टी व्ही कॅमेरे, तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांची रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी अशी माहिती दिली. यावेळी वणी पंचायत समिती शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच केंद्रातील मुख्याध्यापक ,प्राचार्य व शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular