वंचित समाजाने उच्च शिक्षीत होऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करावी –नितीन गडकरी
नागपूर ( जयंत साठे ) वंचित समाजाने उच्च शिक्षीत होऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करावी असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्र नागपूर या संघटनेची स्थापना १४ एप्रिल २०११ रोजी झाली. ही संघटना बाबासाहेबांचे घोष वाक्य शिका , संघटित व्हा, संघर्ष करा वर पुर्णपणे अमंलबजावणी करीत मागील १४ वर्षा पासून कार्यरत आहे. याच अभियानाला अनुसरून ६ जुलै २०२५ रोजी शिक्षक सहकारी बँक गांधीसागर नागपूर च्या सभागृहात दुपारी ३-०० वाजता समाजातील १० वी, १२ वी , स्नातक, स्नातकोत्तर एंव उच्च शिक्षण प्राप्त तसेच विविध क्षेत्रात समाजाचे नांव गौरविण्यात आलेल्या व्यक्तीला ” समाज भूषण ” , “समाज गौरव ” म्हणून मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी मनपा चे झोनल अधिकारी सुनील तांबे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबईचे अध्यक्ष सतिश डागोर, असोसिएट प्रोफेसर व शैक्षणिक मार्गदर्शक पंकज पेठे, भाजपाचे नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, तिरोडा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष राजेश गुणेरिया, सेवा निवृत्त पोलिस अधीक्षक किसन बेरिया, उत्पादन शुल्क विभागाचे से. नि. अधिक्षक सुरेंद्र मनपिया, उमेश पिपंरे राष्ट्रीय अध्यक्ष महादलित परिसंघ राजेश हाथीबेड,सुनील तुर्केल,सतिश खरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील दोन व्यक्तींची निवड करण्यात आली,त्यात ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण ” पुरस्कारासाठी चंद्रपाल घुडनसिंग सोनटक्के व राजु राठोड यांची निवड करण्यात आली.
समाजा तर्फे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबई चे अध्यक्ष व कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे शेरसिंग (सतीश ) डागोर यांच्या शुभ हस्ते स्मृति चिन्ह,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्राद्वारे खालील प्रमाणे पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यात समाज भूषण पुरस्कार्थी म्हणून दिलीप हनुमान खैरवार, शत्रुघ्न राजाराम महतो, अरूण तुर्केल , अरूण मेहरोलिया, ममता रणसुर, समाज गौरव पुरस्कार्थी म्हणून कु खुशबू गोपाल झंझोटे न्यायाधीश, सौरभ गोविंददास खरे एअरफोर्स अधिकारी अमेरिका ,डॉ. अभिषेक मधु पसेरकर (एमडी) डॉ. नुपूर पवन शेंद्रे, डॉ. अमिषा पवन शेंद्रे, डॉ. वैभवी दिपपाल सोनटक्के, डॉ. ओशिन अनिल बघेल, ओजस अनिल बघेल,
अंकीता सुनील तुर्केल, अक्षय सुनील तुर्केल ,मौसम संतोष बैरीसाल, पवी राजा चन्दवंशी, डॉ. विवेक चंडालिया,
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु , श्रीमती रेणुका अमित नकाशे महीला उद्योजक ,श्रीमती संध्या विशाल पैशाडेली यांना प्रोत्साहित करणे बाबत ” उमा सुंदरलाल मलीक पुरस्कार” देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिलन तांबे, संचालन किशोर बिरला तथा महेन्द्र मनपिया तर आभार संजय शेंद्रे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संयोजक ईश्वर नाहर , गोविंददास खरे , अडॅ. अनंत शेंद्रे, राजकुमार खरे, उमेश हाडोते, उमेश तांबे,दिपक बिरहा, प्रदीप महतो ,अजय हाथीबेड , गौरीशंकर शेनदरे, नितिन वामन, प्रदीप मांजरे , राहुल गोराडे, निलेश मतेलकर,मदन वामन, अशोक गोईकर , गणेश ग्रावकर, योगेश मधुमटके,राजेश नक्शे , अमित चिमोटे, जसपाल बिरहा बबलू लंगोटे, मनोज पिंपरे, संजय मलिक, डॉ. आरती बघेल, किरण शेन्दरे, बबीता डेलीकर, मालती बिरला, राखी लुढेलकर दिपा गोईकर, रिना खरे, निलम मांजरे, मंदा तांबे, वंदना तुरकेल, ,दिपा लुढेलकर यांनी अथक परिश्रम घेतले.





