Tuesday, January 13, 2026
Google search engine

स्काऊट गाईड बालमनावर संस्कार करणारी चळवळ – जिल्हासंघटक गजानन गायकवाड.

स्काऊट गाईड बालमनावर संस्कार करणारी चळवळ –
जिल्हासंघटक गजानन गायकवाड.
सुरेंद्र इखारे वणी  :-  स्काऊट गाईड या विषयाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, बंधुप्रेम, सत्कृत्य, स्वावलंबन व सांघिकता या मूल्यांची रुजवण होते. या चळवळीतून जाणारे विद्यार्थी राष्ट्रविकासासाठी उपयोगी पडतात. बालक, युवक देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला असतो. त्याला देशाविषयी अत्यंत आत्मियता असते. याच बाबीमुळे स्काऊट गाईड ही बालमनावर संस्कार करणारी चळवळ असल्याचे प्रतिपादन जिल्हासंघटक गजानन गायकवाड यांनी व्यक्त केले. आदर्श हायस्कूलच्या नानासाहेब गोहोकर रंगमंचावर आयोजित स्काऊट गाईड चळवळीवर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एल मोहिते उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हासंघटक गजानन गायकवाड, अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रमेश बोबडे, पर्यवेक्षक एस आर पिदुरकर उपस्थित होते. अतिथीनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन वैजनाथ खडसे यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular