Sunday, May 31, 2026
Google search engine

नारा पार्क च्या उपोषणस्थळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे व अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचीढ भेट

नारा पार्क च्या उपोषणस्थळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे व अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचीढ भेट

दोन्ही खासदार नारा पार्कचा मुद्दा लोकसभेत उचलणार !

नागपूर ( जयंत साठे ) : दिनांक २१ जुलै

नागपुर सुधार प्रन्यास द्वारा नगर रचना विभागाच्या शहर सिमांकंन समिती द्वारे १९९६ साली रचनाकिंत झालेल्या परंतु आजतागायत पार्क निर्माण न झालेल्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क झाले पाहिजे यासाठी समितीद्वारे गेल्या २९२ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला खासदार श्यामकुमार बर्वे व अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी भेट दिली. उपोषण स्थळी भेट प्रसंगी समितीचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क निर्माण होणं गरजेचं आहे कारण दीक्षाभूमी स्थळी लाखो लोक भेट देतात परंतु दीक्षाभूमी येथे पुरेशा सुविधा नाहीत, परिणामी समाज बांधवांना व पर्यटकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा समाज बांधवांना या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी नियोजित पार्क होणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी अंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन केंद्र, बुद्धीष्ट विद्यापीठ, विधी विद्यापीठ निर्माण करुन येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल व राष्ट्र निर्माणकरिता यांचे योगदान होईल, याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क निर्माण झाला पाहिजे यावर‌ सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच याकरिता न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही माहिती देऊन आपण सदर पार्क निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करुन संसदीय पातळीवर प्रयत्न करावे. अशी साद समितीचे वतीने घातली गेली. या सादेला प्रत्यूत्तर देतांना खासदार बळवंत वानखेडे म्हणाले की, मी माझ्या परीने सदर पार्क निर्माण होण्याकरिता संसदीय स्तरावर प्रयत्न करेल. यावेळी समितीचे सल्लागार एड.शैलेश नारनवरे तसेच समितीचे गजानन जांगडे, राजेश पाटील, अजय खोब्रागडे, रवी चव्हाण, शंकर सोमकुवर, डॉ. मोरे, अशोक बोदांडे, आनंदरक्षित, आनंद वाघमारे, डॉ. इंगळे, नरेश खडसे, राजकुमार मेश्राम, योगेश शेंडे, विद्याधर बागडे, अरविंद बागडे आणि गौतम पाटील, बोनी वालदे, राजू निमसरकर, नंदु माटे, हेंमत वाहणे आणि जितेंद्र मोटघरे यावेळी उपस्थित होते. महिलांमध्ये यमुना रामटेके, रेखा खोब्रागडे, शशिकला चालखुरे, विजया पाटील, वनिता वालदे, अलका रक्षित, जिजा रामटेके भारती वानखेडे, सुषमा कांबळे, वंदना सहारे, चंदा वाघमारे, सुनीता सांगोळे, आशा दहाट, जयश्री सोमकुवर, बेबीताई गजभिये, लिलाबाई साळवे यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular