*लायन्स क्लब वणी पदग्रहण सोहळा संपन्न*
सुरेंद्र इखारे वणी :- लायन्स क्लब वणी चा पदग्रहण सोहळा दि. २६ जुलै २०२५ रोजी लायन्स स्कूल, येथील सभागृहात संपन्न झाला.
लायन सुनील वोरा, माजी प्रांतपाल (डिस्ट्रिक्ट ३२३४ एच १) प्रमूख अतिथी म्हणून तर वणी चे माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, झोन चेअरपर्सन मनिषा पटेल तसेच लायन राजाभाऊ पाथ्रडकर व किशन चौधरी अतिथी म्हणून उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष लायन तुषार नगरवाला (२०२५-२६) तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स लायन राजाभाऊ पाथ्रडकर आय.पी.पी.,महेंद्र श्रीवास्तव प्रथम व,डॉ विजय राठोड द्वितीय उपाध्यक्ष,प्रा. डॉ अभिजित अणे सचिव, डॉ. हिमांशू लाल कोषाध्यक्ष, शमीम अहमद मेंबर्सशीप तर प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे मार्केटिंग चेअरपर्सन, लायन रमेश बोहरा, संजीव चींतलवार, विणा खोब्रागडे, मंजीरी दामले, यश श्रीवास्तव यांनी डायरेक्टर्स म्हणून पदग्रहण केले.
दिप प्रज्वलन व क्लब प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वर्गिय नरेंद्र नगरवाला यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचे सूपुत्र तुषार नगरवाला लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष म्हणून पदग्रहण करतांना आम्हां सर्वांना आनंद होत आहे असे भावपूर्ण मनोगत लायन सुनील वोरा माजी व्यक्त केले. तसेच माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी,लायन्स क्लब वणी चे संस्थापक सदस्य स्व. नरेंद्र नगरवाला आम्हांला दिपस्तंभा सारखे असून त्यांचे सूपुत्र तुषार नगरवाला व सहकारी सेवा कार्यातून कौतुकास्पद कामगिरी करतील अशी आशा व्यक्त करून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर झोन चेअरपर्सन मनिषा पटेल यांनीही यथोचित मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी ध्वज वंदनेचे वाचन महेंद्र श्रीवास्तव यांनी केले तर राजाभाऊ पाथ्रडकर यांनी वर्ष २३-२४ व २४-२५ चा अहवाल सादर करून क्लबला व त्यांना मिळालेला बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड चा गौरवपूर्ण उल्लेख केला. नूतन अध्यक्ष तुषार नगरवाला यांच्या स्विकृतपर मनोगतांनंतर पाहुण्यांना स्मृतिचिन्हे व भेट देऊन तसेच चंद्रकांत जोबनपुत्रा यांना पिन प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली काळे व पौर्णिमा खिरटकर यांनी केले तर लायन्स क्लब चे सचीव प्रा. डॉ. अभिजित अणे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला लायन शांतीलाल पांडे, प्रमोद देशमुख, डॉ. के. आर. लाल, बलदेव खुंगर, सुधीर दामले, ज्योती नगरवाला, खुशी नगरवाला,पुरुषोत्तम खोब्रागडे,छाया श्रीवास्तव, हर्ष खुंगर, नंदलाल शुगवानी, भिकमचंद गोयनका, प्रशांत गोडे,चित्रा देशपांडे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर, पत्रकार , शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.





