वणीच्याआदर्श विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीचे गठण. शिक्षक पालक सभा
सुरेंद्र इखारे वणी :- येथील आदर्श विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले. अध्यक्षपदी मोहन वाईकर व उपाध्यक्ष विनोद खोब्रागडे यांची अविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी प्राचार्य आर एल मोहिते, शिक्षणतज्ज्ञ वसंत गोरे, स्थानिक प्रतिनिधी माजी नगरसेवक आरती वांढरे, शिक्षक प्रतिनिधी म्हणून शंकर पिदुरकर, तर समितीत सदस्य म्हणून ज्योती उइके , मोहना शुक्ला, महेंद्र देठे, कैलास ऊइके, फरानाज शेख, सम्यक करमनकर, आकांक्षा धोबे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा, महिला तक्रार निवारण, परिवहन व सखी सावित्री आदी विविध समित्यांचे गठण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षक, पालक व समाज या घटकांनी सदैव सजग असले पाहिजेत असे प्रतिपादन प्राचार्य आर एल मोहिते यांनी केले. ते आदर्श हायस्कूल येथे आयोजित पालक शिक्षक सभेत मार्गदर्शन करतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एल मोहिते उपस्थित होते. अतिथी म्हणून डॉ पूजा काळे, पर्यवेक्षक एस आर पिदुरकर, मोहन वाईकर, अंगणवाडी सिंधुताई रडके, विनोद खोब्रागडे, भावना मेश्राम उपस्थित होते. डॉ पूजा काळे यांनी किशोरवयीन मुलांना समुपदेशन केले. सूत्रसंचालन वैजनाथ खडसे यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक एस आर पिदुरकर यांनी केले तर आभार अजय बदखल यांनी मानले. यशस्वितेसाठी विकास बलकी, विद्या आत्राम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




