Saturday, May 16, 2026
Google search engine

माणसांची मने प्रेमाने जिंकता येतात –   डॉ. गजानन सोडनर

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे अँटी रॅगिंग कार्यशाळा
माणसांची मने प्रेमाने जिंकता येतात –   डॉ. गजानन सोडनर

सुरेंद्र इखारे वणी  :-   मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. 21 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटी त्यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील अनेक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधून शिस्त लावण्याच्या नावाखाली वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून कनिष्ठ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्या गेल्याचे दाखले आहेत. रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्याचे मानसिक व शारीरिक दृष्ट्या खच्चीकरण होते. कधीकधी या तणावातून विद्यार्थी आत्महत्या देखील करतात. असले प्रकार भविष्यात कुठलाही महाविद्यालयात घडू नयेत म्हणून राष्ट्रीय स्तरावरून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात अँटी रँकिंग कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला अँटी रॅगिंग विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासंदर्भात विद्यापीठाचे आदेश मिळाले त्यावर कार्यवाही म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रदीप माकडे यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग म्हणजे काय म्हणजे काय हे समजावून सांगतानाच त्यांच्या दुष्परिणामाची जाणीवही विद्यार्थ्यांना करून दिली तसेच विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे यावरही मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गजानन सोडनर त्यांनी विद्यार्थ्यांना एकमेकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे सांगितले तसेच इतरांची मने प्रेमाने जिंकता येतात असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक अँटी रॅगिंग कमिटीचे समन्वयक डॉ. शैलेश कांबळे यांनी केले. याप्रसंगी प्रा. प्रवीण पोटे, प्रा. संतोष कनाके, राहुल पिंपळकर व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular