वणीच्या आदर्श मध्ये शालेय विद्यार्थ्याचे एच आय व्ही एड्स विषयी संवेदीकरण कार्यशाळा.
सुरेंद्र इखारे वणी :- येथील आदर्श हायस्कूलच्या नानासाहेब गोहोकर रंगमंचावर शालेय आरोग्य उपक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ इंटेसिफाइड आयइसी कॅम्प अंतर्गत ग्रामिण रुग्णालय वणी यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांकरिता HIV एड्स कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ग्रामीण रुग्णालय वणी येथील टी इ सी समुपदेशक प्रकाश काडे यांनी HIV एड्स काय आहे त्याची कारणे, लक्षणे व उपाय सांगून 1097टोल फ्री क्रमांक याबद्दल मार्गदर्शन केले. सोबतच HIV ऍक्ट 2017काय सांगतो याबाबत एंटेसिफाइड टीइसी कॅम्प राबविण्यात आला. विद्यार्थी व समाजातील व्यक्तींनी या महाभयंकर जीवघेण्या आजाराबाबत सावध व जागरूक असले पाहिजेत असे मत प्रकाश काडे यांनी व्यक्त केले. सोबतच आरकेएसके समुपदेशक अंकुश पाणबुडे यांनी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलामुलींना पोषण आहार, मुलामुलीमधे होणारे शारीरिक बदल या संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा लाभ विद्यालयातील 450विद्यार्थी व 23शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी लाभ घेतला. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एस आर पिदुरकर हे होते. मार्गदर्शक प्रकाश काडे, अंकुश पाणबुडे तर प्रमुख अतिथी प्राचार्य आर एल मोहिते, संध्या लोणारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ खडसे यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




