वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; सणोत्सवात शांतता राखण्याचे नागरिकांना आवाहन
सुरेंद्र इखारे वणी :- येथील पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ईद व इतरही सण उत्सवानिमित्ताने आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली.
या सभेचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी साहेब हे होते. प्रमुख उपस्थिती ठाणेदार भानुदास पिदूरकर, पोलीस निरीक्षक अमरनाथ नागरे साहेब, पोलीस निरीक्षक नरेश रणवीर साहेब, मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी , पोलीस सहायक निरीक्षक शेखर वांढरे उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी आता होऊ घातलेल्या ईद व इतरही सणानिमित्त सर्व समाजबांधवांनी हा सण शांततेत साजरा करावा तो कुठल्याही जाती धर्माचा असो जेणेकरून सणोत्सवाला गालबोट लागणार नाही अशी खबरदारी घ्यावी , चुकीची पोस्ट व्हायरल होणार नाही याची समाजबांधवांनी काळजी घ्यावी पोलिसांचे उद्दिष्ट आहे की सर्व लोकांना समान न्याय देने तसेच गावकऱ्यांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रतिपादन केले.तसेच शांतता समितीचे सदस्य नारायण गोडे, मंगल तेलंग, साईदभाई, रजाक पठाण,मंगला झिलपे, प्रा पुरुषोत्तम पाटील,बाळा खैरे, या सर्व सदस्यांनी वणी शहरातील सणोत्सवात निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचा पाढा वाचला यामध्ये प्रामुख्याने शहरात मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर मोकाट जनावरे, शहराच्या बाजारपेठेत अवैध ऑटोची वर्दळ, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, शहरातील रॅलीच्या मुख्यमार्गावर लोम्बकाळलेली विद्युत वाहिनी, वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य, शहराच्या मुख्य किंवा गल्लीबोळातील रस्त्यावर बांधकामाचे मटेरियल, तसेच रॅलीसाठी ठिकठिकाणी पाणी बॉटल,व महाप्रसाद कागदी प्लेटमध्ये दिला जातो तेव्हा स्वयंसेवकांनी त्याचे व्यवस्थापन करावे अशा विविध समस्यांनी सणोत्सवाला गालबोट लागू नये व कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे अशी अपेक्षा शांतता समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली. शेवटी अध्यक्षीय भाषणातून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी साहेब यांनी शांतता समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे उपस्थितांना आश्वासित केले . सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी केले तर आभार पोलीस सहायक निरीक्षक शेखर वांढरे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संदीप सोयाम, सतीश मुजमुळे व पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला



तसेच शांतता समितीचे सदस्य नारायण गोडे, मंगल तेलंग, साईदभाई, रजाक पठाण,मंगला झिलपे, प्रा पुरुषोत्तम पाटील,बाळा खैरे, या सर्व सदस्यांनी वणी शहरातील सणोत्सवात निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचा पाढा वाचला यामध्ये प्रामुख्याने शहरात मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर मोकाट जनावरे, शहराच्या बाजारपेठेत अवैध ऑटोची वर्दळ, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, शहरातील रॅलीच्या मुख्यमार्गावर लोम्बकाळलेली विद्युत वाहिनी, वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य, शहराच्या मुख्य किंवा गल्लीबोळातील रस्त्यावर बांधकामाचे मटेरियल, तसेच रॅलीसाठी ठिकठिकाणी पाणी बॉटल,व महाप्रसाद कागदी प्लेटमध्ये दिला जातो तेव्हा स्वयंसेवकांनी त्याचे व्यवस्थापन करावे अशा विविध समस्यांनी सणोत्सवाला गालबोट लागू नये व कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे अशी अपेक्षा शांतता समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली. शेवटी अध्यक्षीय भाषणातून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी साहेब यांनी शांतता समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे उपस्थितांना आश्वासित केले . सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी केले तर आभार पोलीस सहायक निरीक्षक शेखर वांढरे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संदीप सोयाम, सतीश मुजमुळे व पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला

