प्रार्थना माणुसकी निर्माण करण्याचा कारखाना.. प्रा डॉ अशोक ऊईके
सुरेंद्र इखारे वणी :- विठ्ठलवाडीत सामुदायिक ध्यान व प्रार्थना मंदिर लोकार्पण सोहळा.
आज माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. युवक व्यसनाधीन झाला आहे. ग्रामसंस्कृतीचा ऱ्हास होत आहे. आपापसातील भेदभाव, द्वेष , तंटे विकोपास गेले आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सामुदायिक ध्यान व प्रार्थना मंदिर उभारणे गरजेचे आहे. तद्वतच सामुदायिक प्रार्थना माणुसकी निर्माण करण्याचा कारखाना आहे असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा प्रा डॉ अशोक ऊईके यांनी व्यक्त केले. विठ्ठलवाडी येथे आयोजित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सामुदायिक ध्यान व प्रार्थना मंदिर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. स्वागत गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवर यांचा सत्कार करण्यात आला. व इतर मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. प्रार्थना हे लोकांमध्ये एकता आणि सहकार्याची भावना वाढवते. आध्यात्मिक विकासाला प्रोत्साहन देते. आणि मानसिक शांती प्रदान करते. असे मत प्रचारप्रमुख प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले. प्रार्थनेमुळे समाज देश आणि जगासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्ती मिळते असे मत सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी गुरुकुंज आश्रम मोझरी चे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे उपस्थित होते.उदघाटक म्हणून डॉ प्रा अशोकराव ऊईके आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, सत्कारमूर्ती माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रमुख उपस्थिती आमदार संजय देरकर , उपसर्वाधिकारी दामोधर पाटील, प्रमुख मार्गदर्शक डॉ ज्ञानेश्वर मुडे निर्वाचन अधिकारी, पद्माकर ठाकरे यवतमाळ जिल्हा सेवाधिकारी, सचिन गाडे मुख्याधिकारी, गोपाल उंबरकर पोलिस निरीक्षक. ग्रामगीताचार्य रमेश तावाडे उपस्थित होते. संचालन ग्रामगीताचार्य दिलीप डाखरे यांनी केले. प्रास्ताविक यवतमाळ जिल्हा प्रचारप्रमुख मारोती ठेंगणे तर आभार ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले . राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली . यशस्वितेसाठी प्रमोद राजुरकर, राजेंद्र कोरडे, ग्रामगीताचार्य विजयाताई दहेकर, लक्ष्मण जुमनाके , देविदास शेटे, किनाके दादा, दुर्गे दादा, भय्याजी तेजे, हरिभाऊ भट, प्रकाश कुचनकर, पुंडलीक धोबे , शारदा बलकी , मंगला डुंबरे, रजनी वकलकर , प्रभा आसेकर , रुंदा पाटेकर, सिंधू गिरकर, अनिल बेलेकर व श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सर्व गुरुदेव प्रेमींनी सहकार्य केले.




