Monday, January 12, 2026
Google search engine

कायरच्या विवेकानंद विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

कायरच्या विवेकानंद  विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

सुरेंद्र इखारे वणी  :-  कायर येथील विवेकानंद विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते प्रमुख पाहुणे वणी पंचायत समिती कायर विभागाचे केंद्रप्रमुख गजाननराव भगत , संस्था सचिव सतीश घुले, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार, सोनाली भोयर उपस्थित होते.आज केंद्रप्रमुख गजाननराव भगत सर यांनी विद्यालयाला भेट देऊन शालेय तपासणी तथा वर्ग पाठ निरीक्षण करून मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी वर्ग 9 ची विद्यार्थिनी कु सानिका चांदसूर्य या मुलीला मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांचेकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भेट म्हणून देण्यात आला. कु सानिका चांदसूर्य हिने गीत गाऊन मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवणातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन त्यांच्या प्रमाणे आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार सोनाली भोयर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मधुकर कोडपे, आकाश बोरूले ,दिलीप कंदस्वार, विद्यार्थी नुपूर थेरे, काळे, अक्षरा उपरे, सानिका चामाटे, यांनी पुढाकार घेतला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular