Tuesday, January 13, 2026
Google search engine

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत मृतकाचे कुटुंबाला अर्थसहाय्य..*

*प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत मृतकाचे कुटुंबाला अर्थसहाय्य..*
सुरेंद्र इखारे वणी :- वणी तालुक्यातील नवरगाव येथील  संजय जनार्दन जेनेकार यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांनी तीन महिन्यापूर्वीच प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजने अंतर्गत 342 रुपयांचा विमा काढला होता. त्याचे नावाने भारतीय स्टेट बँकेत खाते काढलेले होते.संजय जनार्दन जेनेकार यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत 342 रुपयाचा विमा काढला होता. हा विमा अकस्मात मृत्यू झाल्यास या योजने अंतर्गत मृत्यू झालेल्या कुटुंबाला 2 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळते. सदर मृतकाचे नावाने असलेले भारतीय स्टेट बँक कायर येथे प्रधानमंत्री जीवन ज्योतीविमा योजने अंतर्गत मिळणारे अकस्मात विमा रक्कम 342 रूपये चे काढण्यात आला होता.सदर नामक व्यक्तींच्या कुटुंबातील त्यांची पत्नी योगिता संजय जेनेकार व दोन मुले त्यांना कायर येथील भारतीय स्टेट बँक शाखे मधून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत अर्थसहाय्य 2 लाख रुपये लाभ त्यांच्या पत्नीला व मुलांना धनादेश स्वरूपात शाखा प्रबंधक निरंजन खनगण यांचे हस्ते धनादेश चा लाभ देण्यात आला.यावेळी  सहाय्यक विनोद बोंडे, सहाय्यक आस्था ताडुरवार, सुनील ठावरी, सी. एस. पी. संचालक शुभांगी ठावरी, खेमराज बोथले, कुणाल बोथले, कर्मचारी व खातेदार जीवन जेनेकार, मनोज झोडे, अरविंद पिंपळकर,उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular