Friday, April 17, 2026
Google search engine

कायरच्या विद्यालयात विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी.  

कायरच्या विद्यालयात विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी.  

सुरेंद्र इखारे वणी  :-  कायर येथील विवेकानंद विद्यालयात  विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात  साजरी करण्यात आली.

विद्यालयात आयोजित या कार्यक्रमात महामानवाच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शक  विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे  अध्यक्षस्थानी होते तसेच प्रमुख उपस्थिती प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडपे, शिपाई आकाश बोरूले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी  डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक, सामाजिक या विषयावर प्रकाश टाकला.शिक्षणच माणसाचे जीवन बदलवू शकते . म्हणूनच शिका, संघटित व्हा व संघर्ष करा कारण  ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ हाच मंत्र आत्मसात करून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वर्ग आठवीची विद्यार्थिनी कु आचल चिकणकर हिने केले या कार्यक्रमाचे  यशस्वीत्यासाठी  शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular