विश्ववंदनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी
सुरेंद्र इखारे वणी :- चिखलगाव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे साई दर्पण ग्रुप व आदर्श जेष्ठ नागरिक मंडळ चिखलगाव च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
अध्यक्ष श्री.सुरेशभाऊ रायपूरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रमेशभाऊ सुंकूरवार ,
श्री.सुधाकरराव गारघाटे ,श्री.लक्ष्मण इद्दे हे उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हारार्पण व सर्व सदस्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्या सोबतच श्री.अशोकराव चौधरी व श्री.नेताजी मोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचलन श्री.वसंतराव उपरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.दिगंबरराव गोहोकार यांनी केले.यावेळी साई दर्पण ग्रुप व आदर्श जेष्ठ मंडळ चिखलगाव चे अनेक सदस्य हजर होते.





