Wednesday, May 6, 2026
Google search engine

वणी येथील नवीन महसूल भवन येथे  जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण उत्साहपूर्ण पार पडले

वणी येथील नवीन महसूल भवन येथे  जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण उत्साहपूर्ण पार पडले

सुरेंद्र इखारे वणी:–    भारतामध्ये जनगणना ही 1872 पासून केली जात असल्याने  या देशाची 16 वि जनगणना असून  स्वातंत्र्यानंतर 8 वि जनगणना आहे या जनगणनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 23 मे ते 8 मे 2026 असा प्रशिक्षणाचा कालावधी असून जनगणनेच्या चौथ्या बॅच चे प्रशिक्षण दिनांक 2 मे ते 5 मे 2026 रोजी वणी  येथील नवीन महसूल भवन येथे तीन दिवशीय प्रशिक्षण उत्साह पूर्ण पार पडले.

या प्रसंगी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार निमेकर साहेब तसेच  चार्ज अधिकारी तहसीलदार निखिल धुळधर साहेब हे होते. प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र बच्चेवार, प्रमोद ढेंगळे,सुरेश बदखल सर,महादेव शिंदे साहेब, योगेश कोणापुरे ऋषि सुरपाम,  उपस्थित होते.

यावेळी जनगणनेचे महत्व समजावून सांगताना तहसीलदार निमेकर साहेब यांनी जनगणना म्हणजे एखाद्या देशातील लोकसंख्येची, त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थितीची अधिकृत नोंद घेण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे असे मत व्यक्त केले .

स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.असे मत  मार्गदर्शक प्रशिक्षक प्रमोद ढेंगळे सर यांनी व्यक्त केले पुढे ते म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्यापुरती मर्यादित नसून ती देशाच्या नियोजनाचा पाया आहे. सरकार विविध योजना आखताना जनगणनेतील आकडेवारीचा आधार घेत असते. उदाहरणार्थ—शिक्षण, आरोग्य, रोजगार, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा यांसाठी किती निधी द्यायचा, कुठे रस्ते, शाळा, रुग्णालये उभारायची, याचे निर्णय जनगणनेवर आधारित असतात. तसेच जनगणनेमुळे देशातील साक्षरतेचे प्रमाण, ग्रामीण-शहरी लोकसंख्या, रोजगाराची स्थिती, स्थलांतर, भाषा आणि धर्म यांची माहिती मिळते. या माहितीच्या आधारे सरकार योग्य धोरणे आखते असे ते म्हणाले . याप्रसंगी प्रशिक्षणाचे माध्यमातून  जनगणनेवर आधारित स्नेहा गोखरे व वर्षा पारखी मॅडम यांनी उत्कृष्ट नाटीका सादर केले

त्यानंतर केंद्रप्रमुख गजानन भगत,  प्रमोद काकडे, सोनाली भोयर, जयवंत आगलावे  या प्रशिक्षणार्थ्यांनी पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाचा आलेला अनुभव कथन केला. या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular