वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात प्रशिक्षण शिबीर
सुरेंद्र इखारे वणी :- वणी पंचायत समिती समग्र शिक्षा अभियान शिक्षण विभागाचे वतीने लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 10.30 ते 2.30 या कालावधीत वणी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद, सर्व खासगी शाळेतील मुख्याध्यापक, स्कुलबसचे चालक, वाहक व मालक यांना विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणाला उपस्थित यवतमाळ जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभीषण जाधव साहेब, सहायक अधिकारी सूरज बाहेती साहेब, वणी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी निलेश हेडावू साहेब , विस्ताराधिकारी रमेश बोबडे साहेब, विस्ताराधिकारी गणेश भोयर साहेब, वणी बाल कल्याणच्या अधिकारी पेचे मॅडम, पर्यवेक्षिका आरके मॅडम उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात मार्गदर्शन करताना विभीषण जाधव साहेब म्हणाले विद्यार्थ्यांची सुरक्षितता हेच आपले सर्वोच्च प्राधान्य या दृष्टीकोनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन समन्वयक विनोद नासरे यांनी केले तर आभार विस्ताराधिकारी रमेश बोबडे सर यांनी मानले. या प्रशिक्षणाचे यशस्वीत्यासाठी शिक्षण विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात प्रशिक्षण शिबीर




