Wednesday, August 12, 2026
Google search engine

पिल्की वाढोणा येथील जी.प. प्राथमिक शाळेत शिक्षक पालक सभा संपन्न

    पिल्की वाढोणा येथील जी.प. प्राथमिक शाळेत शिक्षक पालक सभा संपन्न

     3 वर्षानंतर शाळा व्यस्थापन समितीची स्थापना

सुरेंद्र इखारे वणी :-  तालुक्यातील  पिल्की वाढोणा येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही नेरड केंद्रांतर्गत  ,पंचायत समिती वणी येथे दिनांक 11/08/2026 ला शिक्षक पालक सभा घेऊन  दोन वर्षासाठी  शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ. रत्नमाला अरुण झाडे ह्या होत्या .पालक सभेतून पालक सदस्य म्हणून सौ .शीतल अमोल पायघन, सौ रुपाली राकेश तलांडे ,सौ योगिता संतोष आत्राम, सौ रंजिता विनोद क्षीरसागर ,सौ प्रतीक्षा अमोल राजूरकर, सौ कविता दिपक देवाळकर,सौ सुवर्णा अनिल झाडे ,सौ अमृता प्रवीण झाडे ,सौ लता बाबाराव पत्रकार, सौ. सुप्रिया गजानन परचाके, श्री दिपक गंगाधर देवाळकर . पालक सदस्यांमधून अध्यक्ष म्हणून श्री दिपक गंगाधर देवाळकर तर उपाध्यक्ष म्हणून सौ रंजिता विनोद क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. स्थानिक प्रतिनिधी म्हणून उपसरपंच सौ रत्नमाला अरुण झाडे. शिक्षण प्रेमी श्री संतोष नत्थूजी काळे ,अंगणवाडी सेविका सौ. वैशाली दशरथ कुमरे तर सचिव म्हणून श्री गंगाधर दादाजी बल्की अशी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. यावेळी  नेरड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गजानन भगत म्हणाले की गेल्या 3 वर्षांपासून बंद असलेली शाळा सुरु करून आज रोजी सर्वांच्या सहकार्याने शालेय नियमानुसार व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली परंतु बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम नुसार शाळेच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी समितीची स्थापना केली परंतु जबाबदारीने पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो असे प्रतिपादन केले. तसेच  तंटामुक्त अध्यक्ष श्री संतोष काळे, उपसरपंच सौ रत्नमाला झाडे व सर्व पालक यांनी सहकार्य केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular