Friday, August 28, 2026
Google search engine

कायरच्या विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

कायरच्या विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून स्काऊट गाईड अंतर्गत रक्षाबंधन हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते.प्रमुख उपस्थिती जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार, गणित शिक्षिका सोनाली ठाकूर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना मधुकर घोडमारे यांनी महाभारतातील द्रौपदी व भगवान श्रीकृष्ण यांचा दाखला दिला व धाग्याचे महत्व पटवून दिले. तर कु सानिका चांदसूर्य हिने रक्षाबंधनावर विचार व्यक्त करून सुंदर गीत सादर केले. यानंतर सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना ओवाळून औक्षवंत करून राखी बांधून चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत अत्यन्त महत्वाचा सण आहे बहीण भावातील अतूट संबध प्रेम ,स्नेह आपुलकीचे प्रतीक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 10 वि ची विद्यार्थिनी कु सानिका चांदसूर्य हिने केले तर आभार सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार यांनी मानले . परंतु या उपक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या उपक्रमशील शिक्षिका सोनाली ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आकाश बोरूले, सचिन टोंगे, व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.।

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular