संस्कृत प्राध्यापक व तत्सम अभ्यासक या प्रवर्गातून प्रा डॉ स्वानंद पुंड यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार घोषित !
सुरेंद्र इखारे वणी :- महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे वतीने सण 2021 ते 2025 या कालावधीचा महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार ,संस्कृत प्राध्यापक व तत्सम अभ्यासक या प्रवर्गातून वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्रा डॉ स्वानंद पुंड यांना घोषित !
सण 2021 ते 2025 या कालावधीसाठीचे महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार सहा प्रवर्गापैकी चार प्रवर्गातून एक व दोन प्रवर्गातून दोन याप्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये सण 2021 या वर्षासाठी प्रवर्ग प्राचीन संस्कृत पंडित यातील पुरस्कारार्थी स्वामी कृष्ण चैतन्य पुरी, वेदमूर्ती प्रवर्गातून माधव व्यंकटेश परांजपे, संस्कृत शिक्षक व इतर प्रवर्गातून वैशाली नायकवडे चव्हाण, डॉ अरुणा सितारामराव शामराज, संस्कृत प्राध्यापक व तत्सम अभ्यासक या प्रवर्गातून डॉ सीमा सुधीर होटे, प्रा डॉ स्वानंद गजानन पुंड, संस्कृत कार्यकर्ता प्रवर्गातून डॉ चंद्रगुप्त श्रीधर वर्नेकर, अन्य राज्यातील संस्कृत पंडित या प्रवर्गातून डॉ वसंतकुमार भट, तर सण 2022 या कालावधीचा प्राचीन संस्कृत पंडित प्रवर्गातून चंद्रशेखर महाराज देगलूरकर, व संस्कृत शिक्षक व इतर प्रवर्गातून सचिन अरुण मुडे याना पुरस्कार प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या पुरस्कारार्थ्यांचं सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे.




