Tuesday, September 8, 2026
Google search engine

अश्रूंना वाट करून देणारा विजय… गुरुजींच्या स्वप्नांचा वारसा जपणारी नाटिका!

अश्रूंना वाट करून देणारा विजय… गुरुजींच्या स्वप्नांचा वारसा जपणारी नाटिका!

विवेकानंद विद्यालय वणी ची जिल्हा नाट्य उत्सवासाठी निवड

प्रितेश लखामपुरे वणी   :- तालुकास्तरीय विज्ञान नाट्य संमेलनामध्ये विवेकानंद विद्यालय, वणी यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या अनोख्या आणि हृदयस्पर्शी नाटिकेची जिल्हा स्तरासाठी निवड….. हा केवळ एका स्पर्धेतील विजय नाही, तर विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा, कलेवरील प्रेमाचा आणि गुरुजनांच्या अथक परिश्रमांचा अभिमानास्पद क्षण आहे.
….ही नाटिका पाहताना उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले… कारण रंगमंचावर केवळ अभिनय सुरू नव्हता, तर भावना जिवंत झाल्या होत्या. प्रत्येक संवादात वेदना होती, प्रत्येक प्रसंगात वास्तव होते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभिनयामध्ये आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा दिसत होती. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांच्या मनाला थेट स्पर्श केला.
……या अद्भुत नाटिकेमागे आहे निर्माता व दिग्दर्शक आदरणीय आशिष कैलासराव मडावी सर यांची अथक मेहनत. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा देणे, प्रत्येक प्रसंगाला जिवंत करणे आणि त्यांच्या कलेला एका अविस्मरणीय उंचीवर नेणे—हे सरांच्या समर्पणाचे आणि कलाप्रेमाचे खरे उदाहरण आहे.
….विद्यार्थ्यांची जिद्द, मेहनत आणि कला सादर करण्याची आगळीवेगळी शैली खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. या यशामागे कितीतरी दिवसांची तयारी, सराव, चुका, सुधारणा आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची जिद्द दडलेली आहे.
……आणि या अभिमानाच्या क्षणी मनात एकच विचार येतो—

“गुरुजी, आज तुम्ही ही नाटिका पाहण्यासाठी हवे होतात…”
……आज तुमचे विद्यार्थीरूपी वारस रंगमंचावर उभे राहून तुमच्या विचारांचा, संस्कारांचा आणि स्वप्नांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. स्वर्गीय दे. मा. ठावरी गुरुजींनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेले संस्कार आज या यशाच्या रूपाने पुन्हा एकदा फुलताना दिसत आहेत. हा विजय पाहून नक्कीच गुरुजींचे मन अभिमानाने भरून आले असते!
……हा विजय केवळ विवेकानंद विद्यालयाचा नाही…
हा विजय प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांचा आहे…
हा विजय आशिष मडावी सरांच्या कष्टांचा आहे…
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—
हा विजय गुरुजींच्या विचारांचा आणि त्यांच्या विद्यार्थीरूपी वारसांचा आहे!
…..या दैदिप्यमान यशाबद्दल नाटिकेतील सर्व गुणी विद्यार्थ्यांचे, निर्माता-दिग्दर्शक आशिष मडावी सरांचे, सर्व सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे आणि विवेकानंद विद्यालय परिवाराचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
या नाटीकेच्या यशासाठी तन मन धनाने शुभेच्छा देणारे आपल्या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमती ताराबाई ठावरी, उपाध्यक्ष  शंकरराव वराटे, सचिव अविनाश ठावरी,  मुख्याध्यापक  दिलीप आस्कर सर उपमुख्याध्यापक  बेसकर सर, पर्यवेक्षक   राठोड सर आणि समस्त विवेकानंद विद्यालयातील सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शुभेच्छा व  बल नाटिकेमागे होते
तुमची कला अशीच फुलत राहो, तुमची जिद्द अशीच पेटत राहो आणि तुमच्या यशाचा झेंडा आणखी उंच फडकत राहोअशी सदिच्छा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular