भालर येथे” सेवा संकल्प अभियान अंतर्गत ” स्वच्छता ही सेवा ” पथनाट्य
सुरेंद्र इखारे वणी :- भालर येथील तुकडोजी महाराज विद्यालय व डब्ल्यूसीएल कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत सेवा माझे योगदान या सामाजिक जाणिवेतून “स्वच्छता ही सेवा” यावर आधारित पथनाट्य सादर केले.
स्वच्छता ही सेवा २०२६ उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता बाबत जनजागृती करून विद्यार्थ्यांनमध्ये सेवाभाव व सामाजिक बांधिलकी व जबाबदारी ची जाणीव निर्माण करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील इयत्ता 10 वि मधील मुलीचा मोठया प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी
संस्थेचे सचिव माननीय सुनील भाऊ वरारकर यांनी सहभागी मुलींचे कौतुक केले तसेच डब्ल्यूसीएल चे जी एम संजय एम मिश्रा, एरिया एच आर मॅनेजर जितेंद्र प्रसाद , नोडल अधिकारी जे.डी राकेश कुमार यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.उत्कृष्ट अस पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनी
तुलशी निमकर,चैतन्या गोवारदिपे,पूनम काळे, गौरी टिकले,सानिका जुनगरी ,खुशी निंदेकर ,जान्हवी माहुरे,भावना खोके, हिमानि खोके, रीतीका टिकले, लक्ष्मी गोरे, समृद्धी दोडके, प्रेरणा गौरकर,सोनल मंदे , वैष्णवी हेकाड , सोनाली काकडे, भूमिका हेपट, स्नेहल बोंडे, श्रेया देठे, वैष्णवी आत्राम गायत्री सूरपाम ह्या होत्या त्यांचे कौतुक विद्यालयाचे
मुख्याध्यापक श्री मनोज वरारकर यांनी केले.
मार्गदर्शन श्री अविनाश वरपटकर लक्ष्मण ढेंगळे , बंडू अडबाले ,नथ्थु जेऊरकर ,यांनी परिश्रम घेतले.




